वृत्तसंस्था
मुंबई : महानंद डेअरीचे दूध गुरुवारपासून दोन रुपयांनी स्वस्त झाले आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात ग्राहकांना दिलासा देण्यासाठी निर्णय घेतला आहे. तसेच विक्री वाढवण्यासाठी प्रति लिटर दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची कपात केली आहे. Mahnand milk Diary Reduces The Price Of Milk by 2 Rupees per letter
राज्यात मागील वर्षी दुधाचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्याकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे अमूल, महानंदसह सर्वच डेअरींनी दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ केली होती. त्यामुळे दूध 48 रुपये प्रतिलिटर झाले.
त्यानंतर राज्यात आता पुन्हा लॉकडाऊन झाल्याने महानंदच्या दुधाचे एकूण वितरण दीड लाखापर्यंत खाली आले आहे. ते वाढवण्याबरोबरच आर्थिक अडचणीतील ग्राहकांना दिलासा देण्यासाठी प्रतिलिटर दुधाचा दर 48 रुपयांवरून 46 रुपये केल्याचे महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार यांनी सांगितले.
25 टक्के विक्री वाढविल्यास कमिशन वाढणार
महानंदने दुधविक्री वाढावी म्हणून वितरकांसाठीही खास योजना आणली आहे. त्यानुसार सध्या विक्री केल्या जात असलेल्या दुधामध्ये 25 टक्क्यांची वाढ केल्यास प्रति लिटरच्या कमिशनमध्ये 85 पैशांची वाढ केली जाणार आहे.
Mahnand milk Diary Reduces The Price Of Milk by 2 Rupees per letter
महत्त्वाच्या बातम्या
- सावधान! दोन दिवसांत पृथ्वीवर कोसळणार चीनचे भरकटलेले महाकाय रॉकेट, मोठ्या विध्वंसाची शक्यता
- आमने-सामने : मराठा आरक्षण रद्द झाल्याचे खापर सत्ताधारी तिन्ही पक्षांनी विरोधी पक्षावर फोडले ; मुख्यमंत्र्यांनी हातही जोडले ; ज्यांनी आरक्षणासाठी जीवापाड प्रयत्न केले त्या ‘भाजपने’ महाविकास आघाडीचे सर्वच डाव हानून पाडले
- शेतकरी आंदोलनातही पोहोचला कोरोना, टिकरी बॉर्डरच्या आंदोलनातील 25 वर्षीय महिलेचे निधन