• Download App
    अखेर महाविकास आघाडी सरकारने अनिल देशमुखांच्या डोक्यावरील हात काढला, रश्मी शुक्ला यांनी बनविलेला अहवाल सीबीआयलो देण्याची तयारी|Mahavikas Aghadi government finally puts its hand on Anil Deshmukh's head, reports prepared by Rashmi Shukla ready to be submitted to CBI

    अखेर महाविकास आघाडी सरकारने अनिल देशमुखांच्या डोक्यावरील हात काढला, रश्मी शुक्ला यांनी बनविलेला अहवाल सीबीआयलो देण्याची तयारी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : अखेर महाविकास आघाडी सरकारने माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या डोक्यावरील हात काढला आहे. सीबीआयला कागदपत्रासह माजी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बनविलेला अहवाल देण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळो देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे.Mahavikas Aghadi government finally puts its hand on Anil Deshmukh’s head, reports prepared by Rashmi Shukla ready to be submitted to CBI

    राज्य सरकारने आता अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी चौकशी करणाऱ्या सीबीआयला संबंधित कागदपत्रे देण्यास तयारी दर्शवली आहे. राज्य सरकार सादर अहवाल एक सप्टेंबर देणार आहेत. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यातर्फे पोलीस खात्यातील भ्रष्टाचारबाबत जो अहवाल तयार केला गेला होता तो अहवाल आता राज्य सरकार सीबीआयकडे देणार आहे.



    राज्य सरकार येत्या मंगळवारी म्हणजेच 1 सप्टेंबरला सदर अहवाल देणार आहे. पण या अहवालाचा वापर केवळ अनिल देशमुख यांच्याशी संबंधित प्रकरणाच्या तपासाठीच सीबीआयने वापर करावा, अशी ताकीद राज्य सरकारने दिली आहे. दरम्यान, सीबीआयने या प्रकरणाशी संबंधित पंचनाम्याच्या देखील प्रत मागितल्या होत्या. पण राज्य सरकारने त्या प्रत देण्यास नकार दिला आहे.

    राज्य सरकारने अनिल देशमुखांच्या विरोधात दोन मुद्दे वगळण्याची याचिका दाखल केली आहे. सचिन वाझेला पोलीस दलात घेण्यामागे आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनिल देशमुख यांचा हस्तक्षेप होता, असे सीबीआयने त्यांच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. हे दोन मुद्दे गुन्ह्यातून वगळावेत, यासाठी राज्य सरकारने याचिका केली होती. हे दोन्ही मुद्दे हे मंत्रालयीन आणि प्रशासकीय कामाचे भाग आहेत.

    त्यामुळे गुन्ह्यात यांचा समावेश करुन सीबीआय मुद्दाम चौकशी करु पाहत आहे, असे राज्य सरकारने याचिकेत म्हटले आहे. महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्यासाठीच सीबीआयने देशमुखांवर गुन्हा दाखल केला, असे राज्य सरकारचं याचिकेत म्हणणे आहे.

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे आरोप केले आहेत. या आरोपांची सीबीआय आणि ईडी चौकशी करत आहे. ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी चारवेळा समन्स बजावलं. मात्र, एकदाही अनिल देशमुख चौकशीला उपस्थित राहिले नाहीत. दरम्यान, एएनआयला ईडीने अनिल देशमुख संपर्कात नसल्याचं सांगितलं. ‘

    आमचा अनिल देशमुख यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ते कुठे आहेत हे आम्हाला माहित नाही. त्यांचं नेमकं ठिकाण माहीत नाही. आम्ही आज सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत आहोत. आम्हाला आशा आहे की आजच्या आदेशानंतर ते तपासाला सहकार्य करतील,’ असं एएनआयने त्यांच्या सुत्राच्या हवाल्याने सांगितलं आहे.

    Mahavikas Aghadi government finally puts its hand on Anil Deshmukh’s head, reports prepared by Rashmi Shukla ready to be submitted to CBI

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस