• Download App
    निर्बंधांच्या कठोर अंमलबजावणीची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी सोपविली जिल्हा प्रशासनांवर आणि पोलीसांवर | Maharashtralockdown news 2021, CM uddhav thackeray entrusts responsibilty on dist, administration and police

    निर्बंधांच्या कठोर अंमलबजावणीची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी सोपविली जिल्हा प्रशासनांवर आणि पोलीसांवर

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – ब्रेक द चेन म्हणत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल जाहीर केलेले कठोर निर्बंध आज रात्री ८.०० वाजल्यापासून लागू झाले. या निर्बंधांच्या कठोर अंमलबजावणीची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी सोपवून दिली आहे, जिल्हा प्रशासनांवर आणि पोलीसांवर. Maharashtralockdown news 2021, CM uddhav thackeray entrusts responsibilty on dist, administration and police

    सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.

    कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ‘ब्रेक दि चेन’मधील १४४ कलमाच्या निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याकडे सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आणि पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. जीवनावश्यक, आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत मात्र तेथे नियम मोडले जात असतील आणि गर्दी होत असेल, तर त्या सुविधा स्थानिक प्रशासनाने बंद कराव्यात, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.



    विवाह समारंभ हे कोरोना संसर्गास मोठ्या प्रमाणावर जबाबदार असल्याचे लक्षात आले आहे. त्यादृष्टीने यावेळेस सर्व नियम व्यवस्थित पाळले जात आहेत किंवा नाहीत हे जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने पाहावे असेही त्यांनी सांगितले.

    कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही. निर्बधांची अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

    Maharashtralockdown news 2021, CM uddhav thackeray entrusts responsibilty on dist, administration and police

    Related posts

    उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ऑफरची फडणवीसांची खेळी; ठाकरे बंधूंच्या ऐक्यात आणि उरल्या सुरल्या महाविकास आघाडीत पाचर मारून ठेवली!!

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य