• Download App
    आरोग्य, गृहनिर्माण सोबतच शिक्षण विभागातही पेपरफुटीची कीड, महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक । Maharashtra State Examinations Department President Tukaram Supe arrested

    आरोग्य, गृहनिर्माण सोबतच शिक्षण विभागातही पेपरफुटीची कीड, महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक

    महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका विभागाचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. पेपरफुटीची कीड आरोग्य आणि गृहनिर्माण याबरोबरच पवित्र मानल्या जाणाऱ्या शिक्षण विभागातही पसरली आहे. पुणे पोलिसांनी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली आहे. Maharashtra State Examinations Department President Tukaram Supe arrested


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका विभागाचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. पेपरफुटीची कीड आरोग्य आणि गृहनिर्माण याबरोबरच पवित्र मानल्या जाणाऱ्या शिक्षण विभागातही पसरली आहे. पुणे पोलिसांनी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली आहे.

    सायबर पोलिसांनी हा कारवाई केली आहे. सायबर सेलने तुकाराम सुपे यांना गुरुवारी चौकशीसाठी बोलावलं होतं. रात्री उशिरा त्यांनी अटक करण्यात आली. शिक्षक पात्रता परीक्षेत परीक्षेत पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा आरोप तुकाराम सुपे यांच्यावर आहे.टीईटी परीक्षांमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे.

    महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) परीक्षेतील गैरप्रकार उघड झाल्यानंतर सर्व परीक्षा रद्द कराव्या लागल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांकडून कंत्राटदार कंपनीच्या संचालकासह सहा जणांना अटक करण्यात आली होती. भरती परीक्षेच्या कामाचे कंत्राट मिळालेल्या ‘जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस’ या कंपनीनेच पेपरफुटीचा प्रयत्न केल्याचं उघड झालं होतं. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनीचा संचालक डॉ. प्रीतेश देशमुख याचाही समावेश होता.



    पोलिसांनी प्रीतिश देशमुखच्या घराची झाडाझडती घेतली असता टीईटीची ओळखपत्रं सापडली होती. तसंच काही अपात्र विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे मिळाली होती. त्यामुळे टीईटी परीक्षेतही गैरकारभार झाल्याची शंका उपस्थित झाली आणि त्यानुसार तपास सुरु झाला. यानंतर पुणे पोलिसांनी तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. या चौकशीनंतर तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे.

    कंत्राटदार कंपनीच पेपरफुटीचा प्रयत्न करीत असल्याची माहिती म्हाडा आणि ‘एमपीएससी’ची तांत्रिक समिती यांना मिळताच शनिवारी म्हाडा पुणे मंडळाने याप्रकरणी सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली. कंपनीचा संचालक प्रीतेश याला भेटण्यासाठी दलाल येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी रात्री दहा वाजता विश्रांतवाडी येथून प्रीतिश आणि दोन दलालांना अटक केली. रविवारी औरंगाबादमधून आणखी दोन दलालांना अटक करण्यात आली. मुंबई, पुणे आणि औरंगाबादमध्ये पोलीस चौकशी करीत आहेत.

    Maharashtra State Examinations Department President Tukaram Supe arrested

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!