Nawab Malik Allegations : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे महाराष्ट्राने सर्वात जास्त चिंता वाढवली आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचाच पहिला क्रमांक लागतो. यामुळे महाराष्ट्र सरकारमधील घटक पक्ष एनसीपीचे नेते नवाब मलिकांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिकांनी ट्वीट करून रेमडेसिव्हिर इंजेक्शनवरून केंद्रावर आरोप केलाय की, केंद्राने रेमडेसिव्हिर इंजेक्शन पुरवठा करणाऱ्या सर्व कंपन्यांना धमकावून महाराष्ट्राला हे औषध देण्यास मनाई केली आहे. या आरोपांनंतर राजकीय भूकंप आला आहे. त्यांच्या या गंभीर आरोपांना केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांनी उत्तर दिले आहे. maharashtra ncp leader nawab malik allegations answered by Central Minister mansukh Mandaviya about remdesivir injection
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे महाराष्ट्राने सर्वात जास्त चिंता वाढवली आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचाच पहिला क्रमांक लागतो. यामुळे महाराष्ट्र सरकारमधील घटक पक्ष एनसीपीचे नेते नवाब मलिकांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिकांनी ट्वीट करून रेमडेसिव्हिर इंजेक्शनवरून केंद्रावर आरोप केलाय की, केंद्राने रेमडेसिव्हिर इंजेक्शन पुरवठा करणाऱ्या सर्व कंपन्यांना धमकावून महाराष्ट्राला हे औषध देण्यास मनाई केली आहे. या आरोपांनंतर राजकीय भूकंप आला आहे. त्यांच्या या गंभीर आरोपांना केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांनी उत्तर दिले आहे.
नवाब मलिकांचे गंभीर आरोप
एकीकडे, केंद्र सरकार महाराष्ट्रातील ढासळलेल्या आरोग्याच्या परिस्थितीवरून सातत्याने शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन देऊन तसेही प्रयत्नही करत आहे. परंतु अशा वेळी नवाब मलिकांच्या आरोपांमुळे विविध प्रश्नांना उधाण आले आहे. आरोप असाही आहे की, या इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी जर त्याचा पुरवठा केला, तर त्यांचे लायसेन्स रद्द करण्याची धमकी केंद्राने दिली आहे.
नवाब मलिक म्हणतात की, “आम्हाला वाटते की, केंद्राची ही भूमिका घातक आहे. देशात लोकं औषधाविना मरत आहेत. महाराष्ट्र सरकार रेमडेसिव्हिर इंजेक्शन खरेद करू इच्छिते, तर विकणाऱ्यांची अडवणूक सुरू आहे. हे चुकीचे आहे. हा भेदभाव नाही का? महाराष्ट्रात राहणारे भारताचे नाहीत का? हे केंद्र सरकारला सांगावेच लागेल.”
मलिकांच्या आरोपांना केंद्रीय मंत्री मंडावियांचे उत्तर
केंद्रीय मंत्री मनसुख मंडावियांनी नवाब मलिकांच्या या गंभीर आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. मंडाविया म्हणाले की, नवाब मलिकांचे हे वक्तव्य हैराण करणारे आहे. त्यांनी जे म्हटले ते, ते अर्धसत्य आहे. त्यांचे वक्तव्य अस्वीकारार्ह आहे. मलिकांना खरी परिस्थिती माहिती नाही. महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत भारत सरकार सक्रिय संपर्कात आहे. हरतऱ्हेने त्यांना रेमेडेसिव्हिरच्या पुरवठ्यात मदत करत आहे. ते म्हणाले की, कंपन्यांना इंजेक्शन न देण्यासाठी धमकावले जातेय. हे एकदम चुकीचे आहे.
मनसुख मंडाविया म्हणाले की, आम्ही देशात याचे दुप्पट उत्पादन करत आहोत. निर्मात्यांना 12 एप्रिल 2021 नंतर 20 हून अधिक उत्पादन युनिटमध्ये अनुमती देण्यात आली आहे. महाराष्ट्राला रेमेडिसिव्हिरचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करणे आमची प्राथमिकता आहे. ते म्हणाले की, माझी आपल्याला विनंती आहे की, तुम्ही या 16 कंपन्यांची सूची, स्टॉकची उपलब्धता आणि WHO-GMPला त्यांच्यासोबत शेअर करा. आमचे सरकार आपल्या लोकांच्या मदतीसाठी सर्वकाही करायला प्रतिबद्ध आहे.
maharashtra ncp leader nawab malik allegations answered by Central Minister mansukh Mandaviya about remdesivir injection
महत्त्वाच्या बातम्या
- अमेरिकेत फेडएक्स कंपनीच्या आवारात गोळीबार, 4 शिखांसह 8 जणांचा मृत्यू, पाच जण गंभीर
- पंतप्रधान मोदींचे संतांना आवाहन : दोन शाही स्नान झाले, आता कुंभ प्रतीकात्मकच ठेवावा!
- Who Is Priti Patel : कोण आहेत ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल? यांच्याच मंजुरीनंतर फरार नीरव मोदीची होतेय ‘घरवापसी’
- जितेंद्र आव्हाड म्हणतात, ‘खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे!’, कवितेतून केली उद्धव ठाकरेंची पाठराखण
- Maharashtra Curfew 2021 : उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, संचारबंदीचे नियम पाळले नाही, तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही!