इतिहासाचे जुने मुद्दे काढून महाराष्ट्रातील वातावरण, सुसंस्कृतपणा, सामाजिक स्वास्थय बिघडवण्यापेक्षा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला नवनिर्माणाची दिशा द्यावी असा टोला संभाजी ब्रिगेडने लगावला आहे
विशेष प्रतिनिधी
पुणे -इतिहासाचे जुने मुद्दे काढून महाराष्ट्रातील वातावरण, सुसंस्कृतपणा, सामाजिक स्वास्थय बिघडवण्यापेक्षा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला नवनिर्माणाची दिशा द्यावी. चांगल्या कामासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा व इतिहासकारांचा वापर त्यांनी करावा. जुन्या इतहासकरांनी इतिहासात ज्या काही चुका केल्या आहे त्या चुका पुन्हा पुन्हा वगळायला गेले तर राज ठाकरेच ताेंडावर पडतील. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरे हा विषय राज ठाकरे यांनी कुटुंबापुरता व्यैक्तित ठेवावा अशी टिका संभाजी ब्रिगेडच्या वतीने विकास पासलकर यांनी पत्रकार परिषदेत केली. Maharashtra Navanirman Sena leader Raj Thakare need to say about Maharashtra development issues
यावेळी संभाजी ब्रिगेडचे संताेष शिंदे, नितीन पायगुडे, अंजुम इनामदार , जिंतेंद्र साळुंखे उपस्थित हाेते. पाटील म्हणाले, सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती अतिशय खराब झाली आहे. यासाठी जुने इतिहासाचे दाखले देऊन इतिहास व वर्तमान खराब करण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहे. जेम्स लेन लिखित पुस्तक ‘द हिंदू किंग इन इस्लामिक इंडीया’ बाजारात आल्यानंतर संभाजी ब्रिगेडने याप्रकरणात सहभाग घेऊन भांडारकर संस्थेवर हल्ला निषेध नाेंदवला. प्रबाेधनकारक ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांचा खाेटा इतिहास लिहिणाऱ्या इतिहासकारांच्या व त्यांच्या जातीय व्यवस्थेवर लिखाण केले आहे राज ठाकरे यांनी याचा अभ्यास करावा. मागील १५ दिवसात राज्यात राजकीय चिखलफेक सुरु असून त्यामुळे सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती बिघडली आहे. राज ठाकरे यांची भूमिका सातत्याने बदलत असून काेणत्याही एका विचारावर ते ठाम नाही हे त्यांच्या वेळाेवेळीच्या कृतीतून दिसत आहे. मशिदीवरील भाेंग्याबाबत ठाकरे यांना आक्षेप असेल तर याबाबत त्यांनी भडकाऊ वक्तव्ये करण्यापेक्षा न्यायालयात अवमान याचिका दाखल केली पाहिजे.
पासलकर म्हणाले, ज्या पध्दतीने राज ठाकरे आपल्या पक्षाचा अजेंडा रेटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा गैरवापर करत आहे ते कितपत याेग्य आहे ? त्यांच्या भाषणात या देशातील सरसकट उत्तर भारतीय, बिहाणी लाेकांना झाेडून काढण्याची भाषा करतात ते पाहता, त्यांनी स्वत: भाषणावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताे म्हणून स्वत:ची पाठ थाेपटून घेणे कितपत याेग्य आहे याचे आत्मपरीक्षण करायला हवे. समान नागरी कायदा आणि आरक्षण यातील फरक ही राज ठाकरे यांना माहिती नाही, त्यांनी कधीच मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला नाही.
Maharashtra Navanirman Sena leader Raj Thakare need to say about Maharashtra development issues
महत्त्वाच्या बातम्या
- हनुमानाच्या १०८ फूट उंच पुतळ्याचे अनावरण
- कोल्हापूर पोटनिवडणुकीत जिंकली काँग्रेस; आनंदाच्या घुगऱ्या खात आहेत शिवसेनेचे संजय राऊत!!
- Kolhapur Byelection : कोल्हापूर उत्तर मध्ये जिंकली काँग्रेस; हरला भाजप; पण दणका मात्र शिवसेनेला!!
- पुतीन यांना मुलीचा गॉडफादर म्हणणाऱ्या व्यक्तीची ५५ घरे, २६ कार युक्रेनमध्ये जप्त