Maharashtra lockdown : राज्यात कोरोना महामारीने हाहाकार उडवला आहे. संचारबंदी सुरू असूनही रुग्णसंख्येत घट झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी सर्वानुमते राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या लॉकडाऊनची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: करणार आहेत. Maharashtra lockdown Strict lockdown in the state likely from tomorrow, decision after cabinet meeting
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात कोरोना महामारीने हाहाकार उडवला आहे. संचारबंदी सुरू असूनही रुग्णसंख्येत घट झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी सर्वानुमते राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या लॉकडाऊनची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: करणार आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्यात लॉकडाऊनची गरज असल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार नुकतेच म्हणाले होते. आज मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “बैठकीत सर्वानुमते लॉकडाऊनवर एकमत झाले आहे. हा लॉकडाऊन कडक असणार आहे. लॉकडाऊन उद्या रात्री आठ वाजेपासून लागू करावा अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत मुख्यमंत्री स्वत: घोषणा करणार आहेत.”
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना म्हटलंय की, राज्यात कडक लॉकडाऊन लागणार आहे. राज्यातील कोरोनाचे आकडे कमी करण्यासाठी कठोर निर्बंध आवश्यक आहेत. कडक लॉकडाऊन हवं, ही जनतेची भावना आहे. उपचार मिळत नाहीत, ऑक्सिजन नाही, परराज्यातून ऑक्सिजन आणतोय. ही चेन ब्रेक करण्यासाठी कठोर निर्बंध हवेत. ऑक्सिजन प्लाँट उभारून हवेतील ऑक्सिजन कामी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री उद्या निर्णय जाहीर करतील, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुंबईचे पालकमंत्री असलम शेख म्हणाले की, लॉकडाऊनबाबत महत्त्वाची चर्चा झाली आहे. याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. राज्यात काही तासात कडक लॉकडाऊन लावावा लागेल. लॉकडाऊनबाबत नवी नियमावली ठरवली असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल, असंही शेख यांनी सांगितले.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. हा लॉकडाऊन 15 दिवसांचा असेल, असे संकेत देत याबाबत मुख्यमंत्री ठाकरे उद्या घोषणा करणार असल्याचेही त्यांनी सांगितलं.
Maharashtra lockdown Strict lockdown in the state likely from tomorrow, decision after cabinet meeting
महत्त्वाच्या बातम्या
- ज्येष्ठ मराठी अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनामुळे निधन, ठाण्यातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
- …तर कन्नडिगांना मुंबईत व्यवसाय करणे दुरापास्त होईल, संजय राऊतांनी दिला इशारा
- दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल विलगीकरणात, पत्नी सुनीता यांना झाली कोरोनाची लागण
- राहुल गांधींना कोरोनाची लागण, पंतप्रधान मोदींनी लवकर बरे होण्याची व्यक्त केली कामना!
- ‘साप-साप म्हणून भुई थोपटणाऱ्यांचं तोंड फुटलं’, शिंगणेंच्या कबुलीनंतर प्रवीण दरेकरांची आघाडी सरकारवर टीका