- कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला अधिक दक्ष राहण्यास सांगितले.
विशेष प्रतिनिधी
मुंबई :2020 मध्ये कोव्हिड 19 ने धुमाकूळ घातला तेेव्हा आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखविला होता, मात्र आताची परीक्षा अधिक कठीण आणि आव्हानात्मक आहे. त्यामुळे ब्रेक द चेन नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत .
सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने याकडे लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला अधिक दक्ष राहण्यास सांगितले आहे.
MAHARASHTRA LOCKDOWN 2021
काय म्हणाले मुख्यमंत्री
आज ते सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी , पालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत बोलत होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
- अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा.
ऑक्सिजनचा उचित आणि योग्य वापर तसेच रेमडेसिव्हीरसंदर्भात काळजीपूर्वक पाऊले उचलावी लागतील. - आपण उभारलेल्या जम्बो सुविधा या येणारा पावसाळा, वादळे लक्षात घेऊन सुरक्षित आहेत किंवा नाही ते तपासून घ्यावे.
- सर्व रुग्णालयांचे अग्नी सुरक्षा ऑडिट त्वरेने पूर्ण करून घ्यावे, यात कोणताही निष्काळजीपणा ठेवू नये. सूक्ष्म आणि लहान कंटेनमेंट क्षेत्रांकडे विशेष लक्ष द्यावे.
- जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत, मात्र याचा अर्थ तिथे नियम मोडले जात आहेत, किंवा गर्दी होत आहे असे दृश्य दिसता कामा नये.
- अन्यथा त्या सुविधा स्थानिक प्रशासनाने बंद कराव्यात अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्यात.
- विवाह समारंभ हे कोरोना संसर्गास मोठ्या प्रमाणावर जबाबदार . सर्व नियम व्यवस्थित पाळले जात आहेत किंवा नाहीत हे जिल्हा व पोलीस प्रशासनाने पाहावे.
- ऑक्सिजन सांभाळून आणि गरजेप्रमाणेच वापरावा .
- कुठलाही अतिरेक किंवा विसंगत कृती करू नये, कोणतीही शंका असल्यास मंत्रालयाला तातडीने मार्गदर्शन मागावे.