वृत्तसंस्था
मुंबई : देशात इंधनाच्या कर संकलनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. करवसुलीमुळे जनतेची पिळवणूक केली जात आहे. विशेष म्हणजे महागाईच्या विरोधात ठाकरे पवार सरकारमधील प्रमुख राष्ट्रवादी हा पक्ष आंदोलन करत आहे. पण, सरकारला कर कपात करण्याचा सल्ला देत नाही. Maharashtra leads in fuel tax collection; Mass extortion; No tax relief
गेल्या ३ वर्षांत पेट्रोल आणि डिझेलवरील करातून सरकारला कोट्यवधींची कमाई झाली आहे. तुम्ही तुमच्या कारमध्ये १०० रुपये किमतीचे पेट्रोल टाकल्यावर त्यातील ५२ रुपये टॅक्स म्हणून सरकारच्या खिशात जातात. महाराष्ट्रात, जास्तीत जास्त ५२.५० रुपये (१०० पैकी) कर म्हणून गोळा केले जातात. दुसरीकडे, जर तुम्ही दिल्लीत १०० रुपयांचे पेट्रोल भरले, तर त्यातील ४५.३ रुपये सरकारकडे जातात.
भाजप शासित राज्यात करसवलत दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या तुलनेत तेथे इंधन स्वस्त आहे. पण, गेल्या काही दिवसात इंधन दर वाढीने जनता हैराण झाली आहे. चार दिवसात पेट्रोल अडीच रुपयांनी महागले आहे.
Maharashtra leads in fuel tax collection; Mass extortion; No tax relief
महत्त्वाच्या बातम्या
- ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सोनिया गांधींच्या समोरच काँग्रेसवर केला हल्लाबोल, ठरवले एअर इंडियाच्या दुर्दशेला जबाबदार
- नाशकात भगवी शॉल घालून ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटासाठी गेलेल्या महिलांना रोखलं, थिएटरबाहेरच काढायला लावली गळ्यातील शॉल, भाजपची मुख्यमंत्र्यांवर टीका
- कोरोनामुळे मृत्यूंचा घोटाळा : नुकसानभरपाईच्या खोट्या दाव्यांवर सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, महाराष्ट्रासह 3 राज्यांतून पडताळणी
- Uniform Civil Code : पहिल्या कॅबिनेट बैठकीत उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामींची मोठी घोषणा, समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय, निवडणुकीत दिले होते आश्वासन