• Download App
    एकीकडे राज्यात कडक निर्बंध, दुसरीकडे IPL 2021च्या आयोजनाला महाराष्ट्र सरकारचा ग्रीन सिग्नल । Maharashtra government green signal to organize IPL 2021 Matches

    एकीकडे राज्यात कडक निर्बंध, दुसरीकडे IPL 2021च्या आयोजनाला महाराष्ट्र सरकारचा ग्रीन सिग्नल

     IPL 2021 : राज्यात कोरोना महामारीने थैमान घातलेले असल्याने राज्य सरकारने कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन लादले आहे. यादरम्यान खासगी ऑफिसेसना जास्तीत जास्त वर्क फ्रॉम होम, 50 टक्के उपस्थिती, रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत संचारबंदी आणि शनिवार व रविवार संपूर्ण लॉकडाऊन अशा उपायोजना राबवण्यात आल्या आहेत. परंतु याचदरम्यान आयपीएल  (IPL 2021) सामन्यांच्या आयोजनाला मात्र राज्य शासनाने हिरंवा कंदिल दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. Maharashtra government green signal to organize IPL 2021 Matches


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यात कोरोना महामारीने थैमान घातलेले असल्याने राज्य सरकारने कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन लादले आहे. यादरम्यान खासगी ऑफिसेसना जास्तीत जास्त वर्क फ्रॉम होम, 50 टक्के उपस्थिती, रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत संचारबंदी आणि शनिवार व रविवार संपूर्ण लॉकडाऊन अशा उपायोजना राबवण्यात आल्या आहेत. परंतु याचदरम्यान आयपीएल सामन्यांच्या आयोजनाला मात्र राज्य शासनाने हिरवा कंदील दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

    आयपीएलसाठी कडक नियमावली

    महाराष्ट्र सरकारने जाहीर केले आहे की आयपीएलचे सामने मुंबईत कोणत्याही व्यत्ययाशिवाय होणार आहेत. मात्र, सामन्यादरम्यान प्रेक्षकांना मैदानावर जाऊ दिले जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

    महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी आयपीएल सामने आयोजित करण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “आयपीएल स्पर्धेस मान्यता देण्यात आली आहे. परंतु सामने आयोजित करताना नियम काटेकोरपणे पाळावे लागतील. प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाऊ दिले जाणार नाही. खेळाडू आणि उर्वरित स्टाफ यांना बायो बबलमध्ये वेगळे करावे लागेल.

    बीसीसीआयला खेळाडूंना लस देण्याची इच्छा

    बीसीसीआयनेही खेळाडूंना लस देण्याची मागणी केली. नवाब मलिक म्हणाले, “बीसीसीआयची इच्छा होती की सर्व खेळाडूंनी लसी द्यावी.” पण आयसीएमआर मार्गदर्शक तत्त्वांमुळे हे होऊ शकले नाही. सध्या आम्ही 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना लस देऊ शकत नाही.”

    आयपीएल वेळापत्रकात बदल नाही…

    मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात दररोज विक्रमी संख्येने कोरोना रुग्ण आढळत आहेत. राज्यात परत लॉकडाऊनची स्थिती निर्माण होते की काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. मुंबईऐवजी हैदराबादमध्ये सामने खेळवले जातील, असे अंदाज बांधले जात होते. मात्र, बीसीसीआयने मुंबईत होणाऱ्या सामन्यांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आयपीएलचे सामने मुंबईत 10 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान होणार आहेत. आयपीएलचा 14 वा सीझन 9 एप्रिलपासून सुरू होईल.

    Maharashtra government green signal to organize IPL 2021 Matches

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!