Maharashtra Curfew 2021 : राज्यात शनिवारी कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. मागच्या 24 तासांत राज्यभरात 67,123 नवे रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान 419 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 14 एप्रिलच्या रात्री 8 वाजेपासून 1 मे सकाळी 7 पर्यंत अशी पंधरा दिवसांची संचारबंदी लागू आहे. यादरम्यान सर्वसामान्यांच्या हालचालींवर अनेक निर्बंध घालण्यात आलेले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू आहे. फक्त महत्त्वाच्या कामासाठीच लोकांना बाहेर पडण्याची मुभा आहे. तरीही कोरोना रुग्णसंख्येत दररोज चढत्या क्रमाने वाढ होताना दिसत आहे. Maharashtra curfew 2021 State Records highest 67,123 new patients in 24 hours, 419 deaths
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात शनिवारी कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. मागच्या 24 तासांत राज्यभरात 67,123 नवे रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान 419 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 14 एप्रिलच्या रात्री 8 वाजेपासून 1 मे सकाळी 7 पर्यंत अशी पंधरा दिवसांची संचारबंदी लागू आहे. यादरम्यान सर्वसामान्यांच्या हालचालींवर अनेक निर्बंध घालण्यात आलेले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू आहे. फक्त महत्त्वाच्या कामासाठीच लोकांना बाहेर पडण्याची मुभा आहे. तरीही कोरोना रुग्णसंख्येत दररोज चढत्या क्रमाने वाढ होताना दिसत आहे.
राज्यातील संचारबंदीचे नियम काटेकोरपणे पाळले नाहीत, तर संपूर्ण लॉकडाऊनची वेळ येऊ शकते, असे उपमुख्यमंत्री अजित नुकतेच म्हणाले होते. देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. यामुळे मोठी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. याचदरम्यान राज्यात अनेक ठिकाणी बेड व ऑक्सिजनची कमतरता असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे. यासाठी केंद्राने राज्याला रेमडेसिव्हिर व ऑक्सिजनच्या सुरळीत पुरवठ्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
दुसरीकडे, मागच्या 24 तासांत 56,783 रुग्णही बरे झाले आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या वाढून 6 लाख 47 933 पर्यंत गेली आहे. तर एकूण बरे झालेल्यांची संख्या 30 लाख 61 हजार 174 झाली आहे. कोरोनामुळे एकूण मृत्यूंची संख्याही 59,970 वर गेली आहे. महाराष्ट्रात एकूण 2 कोटी 35 लाख 80, 913 टेस्ट करण्यात आलेल्या आहेत. यापैकी 37 लाख 70, 707 पॉजिटिव्ह आढळलेले आहेत.
Maharashtra curfew 2021 State Records highest 67,123 new patients in 24 hours, 419 deaths
महत्त्वाच्या बातम्या
- UPI Transactions : 50 रुपयांखालील UPI व्यवहारांना चाप, लवकरच बदलणार आहेत नियम
- केंद्राचा मोठा दिलासा, अनेक औषधांच्या किमती केल्या कमी, रेमडेसिव्हिरही 1900 रुपयांनी स्वस्त, येथे पाहा यादी
- पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत रात्री 8 वाजता बैठक; कोरोना संसर्ग, लसीकरणासह या मुद्द्यांवरही होऊ शकते चर्चा
- Twitter Down Globally : जगभरात ट्विटर ठप्प, युजर्सना ट्वीट करायला येतेय अडचण, लॉगआऊटचा येतोय मेसेज
- निर्लज्ज राजकारण थांबवा; महाराष्ट्राला सर्वात जास्त ऑक्सिजनचा पुरवठा, पीयूष गोयल कडाडले