प्रचंड वेगाने वाढणाऱ्या कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्रात पुढचे पंधरा दिवस कडक निर्बंधांसह संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बुधवारी रात्रीपासून अमलात आलेल्या या संचारबंदीचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. Maharashtra Curfew 2021 crowd seen at Andheri station at night
विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रचंड वेगाने वाढणाऱ्या कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्रात पुढचे पंधरा दिवस कडक निर्बंधांसह संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बुधवारी रात्रीपासून अमलात आलेल्या या संचारबंदीचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.
लॉकडाउनसदृश निर्बंध रात्री आठ वाजेपासून प्रभावात आले, हे निर्बंध एक मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. परंतु, सरकारच्या या ‘ब्रेक द चेन’ मोहिमेचा काही जणांवर प्रभाव पडताना दिसत नाही. निर्बंध असूनही लोकं मनमानी पद्धतीने वागताना दिसत आहेत.
महाराष्ट्रात बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून लॉकडाउनसारखे निर्बंध लागू झाले, तरीही अंधेरी स्थानकाबाहेर रात्री साडेआठच्या सुमारास प्रचंड गर्दी दिसून आली. लोक कोरोनाबाबत बेफिकीर राहिलेले दिसून आले.
महाराष्ट्रात कोरोनाचे 58,952 नवीन रुग्ण
दुसरीकडे, राज्यात दररोज 50 हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद होत आहे. बुधवारी, कोरोनाचे 58,952 नवीन रुग्ण नोंदवले गेले, तर 278 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण मृतांची संख्या 58,804 वर गेली आहे.
Maharashtra Curfew 2021 crowd seen at Andheri station at night
महत्त्वाच्या बातम्या
- आमने-सामने : पंढरपूर-पाऊस-सभा ‘करेक्ट कार्यक्रम’ ; ‘मायच्यान’ ह्या निवडणुकीत तुफान रंगत ; फडणवीस-मुंडे भिडले
- हरिद्वारमध्ये तिसऱ्या शाहीस्नानालाही लाखो भाविकांची झुंबड; कोरोनाचा कुंभमेळ्यावर काहीच परिणाम नाही
- सामुदायिक नमाज पठण करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाकडून नामंजूर
- आमच्याशी संवाद साधण्याचीही ममतादीदींना नाही फिकीर, दिवंगत आनंद बर्मनच्या वडिलांचा गंभीर आरोप
- मोदींच्या नेतृत्वाखालील भारत पाकविरोधात लष्करी बळाचा वापर करण्याची शक्यता अधिक, अमेरिकेतील अहवालाने खळबळ