Maharashtra crosses 125000 covid deaths milestone : कोरोनाची दुसरी लाट राज्यातून अद्याप पूर्ण ओसरलेली नाही. कोरोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंच्या बाबतीत राज्याने आज सव्वा लाखांचा टप्पा ओलांडला आहे. म्हणजेच राज्यात आजपर्यंत 1 लाख 25 हजारांहून जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, मागच्या 24 तासांत राज्यभरातून कोरोनाचे 8992 नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही लॉकडाऊनमध्ये पूर्ण सूट देण्यात आलेली नाही. Maharashtra crosses 125000 covid deaths milestone today, Know Maharashtra Covid 19 Updates
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोनाची दुसरी लाट राज्यातून अद्याप पूर्ण ओसरलेली नाही. कोरोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंच्या बाबतीत राज्याने आज सव्वा लाखांचा टप्पा ओलांडला आहे. म्हणजेच राज्यात आजपर्यंत 1 लाख 25 हजारांहून जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, मागच्या 24 तासांत राज्यभरातून कोरोनाचे 8992 नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही लॉकडाऊनमध्ये पूर्ण सूट देण्यात आलेली नाही.
मागच्या 24 तासांत 8992 नवे रुग्ण आढळल्याने आजपर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या 61,40,968 झाली आहे. तर याचदरम्यान 10,458 जण बरे झाल्याने आतापर्यंत एकूण 59,00,440 जणांनी कोरोनावर मात केली आहे. या काळात 200 नव्या मृत्यूंमुळे मृत्यूंचा एकूण आकडा 1,25,034 वर गेला आहे. राज्यात सध्या 1,12,231 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. राज्य सरकारने संभाव्य तिसऱ्या लाटेसाठीही पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना केल्या आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कालपर्यंत 3 कोटी 57 लाख 73 हजार 241 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दि. 8 जुलै 2021 रोजी 3,18,143 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.
राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना परिस्थितीत आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रामध्ये विविध ३६ अभ्यासक्रमांमधून येत्या तीन महिन्यात २० हजार इतके प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचा काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. 2020 मध्ये कोरोनामुळे बेरोजगारीचा निर्देशांक वाढला होता. पण अशा प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे युवकांना रोजगारसंधी उपलब्ध होतील. राज्यातील सर्व जिल्हा, उपजिल्हा, आयुर्वेदीक रुग्णालये यांच्यामार्फत संपूर्ण सहकार्य करण्यात येईल. उमेदवारांना प्रशिक्षणाबरोबरच विद्यावेतनही मिळणार आहे. लसीकरणासारख्या विविध मोहीमांना वेळोवेळी चांगले मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असे त्यांनी सांगितले.
Maharashtra crosses 125000 covid deaths milestone today, Know Maharashtra Covid 19 Updates
महत्त्वाच्या बातम्या
- धर्मांतराच्या प्रश्नावर नितीश कुमारांचे मंत्री जमा खान म्हणाले – मी मूळचा हिंदूच, पूर्वजांनी स्वीकारला होता इस्लाम !
- धक्कादायक : कार्यकर्त्याने द्रमुकच्या विजयासाठी केला होता नवस, पूर्ण झाल्याने मंदिरासमोर केली आत्महत्या
- Uniform Civil Code : दिल्ली हायकोर्टाचे केंद्राला निर्देश, समान नागरी संहिता लागू करण्याची हीच योग्य वेळ, आवश्यक पावले उचला!
- अयोध्येत मोठी दुर्घटना, शरयू नदीत स्नान करताना एकाच कुटुंबातील 12 जणांचा बुडून मृत्यू
- स्वदेशी मायक्रो ब्लॉगिंग साइट Koo वर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एंट्री, यापूर्वी अनेक केंद्रीय मंत्र्यांचेही Koo वर खाते