शिंदे-फडणवीस सरकारकडून पहिल्याच अर्थसंकल्पात समजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न
विशेष प्रतिनिधी
शिंदे-फडणवीस सरकारच आज पहिला अर्थसंकल्प विधिमंडळात जाहीर झाला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्राच्या अमृतकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे, शिवाय देवेंद्र फडणवीस यांनीही प्रथमच अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पांच्या या वैशिष्ट्यांबरोबरच अर्थसंकल्पातील तरतूदींही महत्त्वाच्या आहेत. Maharashtra Budget Huge fund for youth employment and increase in scholarship for students along with emoluments of teaching staff
पंचामृतावर आधिरत असणाऱ्या या अर्थसंकल्पात समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकारकडून करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. या अर्थसंकल्पात तरूण वर्गाच्या रोजगार निर्मितीसाठी भरघोस निधी देण्यात आला. शिवाय शिक्षणसेवकांच्या मानधनासह विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीतही वाढ जाहीर केली गेली. याचबरोबर विद्यार्थ्यांना मोफत गणवेशही मिळणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे युवा वर्गाबरोबरच शिक्षक, विद्यार्थी वर्गातूनही आनंद व्यक्त केला जात आहे.
Maharashtra Budget : ‘शक्तिपीठ’ महामार्गासाठी ८६ हजार ३०० कोटींच्या निधीची अर्थसंकल्पात घोषणा
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ किती? –
इयत्ता पाचवी ते सातवी : एक हजार रुपयांवरून पाच हजार रुपये वरुन ५ हजार रुपये आणि इयत्ता आठवी ते दहावी : एक हजार ५०० रुपयांवरुन ७ हजार ५०० रुपये अशी वाढ करण्यात आली आहे. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देण्यात येणार आहे.
रोजगारनिर्मिती, सक्षम, कुशल-रोजगारक्षम युवा विभागांसाठी भरघोस तरतूद –
– उद्योग विभाग : ९३४ कोटी
– वस्त्रोद्योग विभाग : ७०८ कोटी
– कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विकास विभाग : ७३८ कोटी रुपये
– शालेय शिक्षण विभाग : २७०७ कोटी रुपये
– उच्च व तंत्रशिक्षण विभाग : १९२० कोटी रुपये
– वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग : २३५५ कोटी रुपये
– क्रीडा विभाग : ४९१ कोटी रुपये
– पर्यटन विभाग : १८०५ कोटी रुपये
शिक्षणसेवकांच्या मानधन वाढ –
अर्थसंकल्पात शिक्षणसेवकांच्या मानधनात सरासरी दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवकांचं मानधन ६००० वरुन १६,००० रुपये करण्यात आले आहे. तर माध्यमिक शिक्षण सेवकांच्या मानधनात ८००० वरुन १८,००० रुपये अशी वाढ करण्यात आली आहे. याशिवाय उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांचं मानधन ९००० वरुन २०,००० रुपये करण्यात आले आहे. त्याशिवाय पीएमश्री ८१६ शाळांना ५ वर्षांत १५३४ कोटी रुपये देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांना ५०० कोटी रुपये अनुदान –
– डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था, पुणे
– राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर
– शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती
– कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे
– गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली
– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर
– डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ
– मुंबई विद्यापीठ
– लक्ष्मी नारायण इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूर या संस्थेला अभिमत विद्यापिठाचा दर्जा देऊन वरील सर्व संस्थांना ५०० कोटी रूपये विशेष अनुदान देण्यात येणार आहे. तसेच, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूरला इमारत बांधकामासाठी निधी दिला जाणार आहे.
Maharashtra Budget Huge fund for youth employment and increase in scholarship for students along with emoluments of teaching staff
महत्वाच्या बातम्या
- शरद हे शादाब असते तर सेक्युलरांनी त्यांना भाजपची बी टीम म्हटले असते का??, नागालँड वरून ओवैसींचा पवारांना टोला
- ‘’विरोधकांना हा अर्थसंकल्प निराशजनक वाटेल याबद्दल मनात काही शंका नाही, कारण…’’ सुधीर मुगंटीवारांनी लगावला टोला!
- Maharashtra Budget : शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात महापुरुषांच्या स्मारकांसाठीही भरघोस निधी जाहीर
- ‘’पाकिस्तानने जर मोदींच्या राजवटीत भारताला चिथावलं तर…’’ अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात दावा