प्रतिनिधी
मुंबई – महाविकास आघाडीत निधी वाटपात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे शिवसेना आणि काँग्रेस यांच्यावर अन्याय करतात, हे सन २०२२ च्या अर्थसंकल्पात देखील आकडेवारीनिशी सिध्द झाले. यंदाच्या अर्थसंकल्पात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांना तब्बल ५७ % निधी अर्थमंत्री अजित पवारांनी दिला आहे.Maharashtra Budget 2022 – ajit pawar gives 57% allocation to NCP ministers portfolios
शिवसेना आमदारांची तक्रार
शिवसेनेच्या एकूण ५६ आमदारांपैकी २५ ते ३० आमदारांनी शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रार देखील केली होती. या तक्रारीला राज्याच्या अर्थसंकल्पवरील चर्चेला सुरुवात करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर घणाघाती हल्ला केला. ज्याची ताकद आहे त्याला मदत आहे, ज्याची कमी ताकद तो उपाशी, अशी आहे अर्थसंकल्पाची स्थिती.
देवेंद्र फडणवीसांनी काढले वाभाडे
मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आहेत म्हणून मुंबई शहराच्या निधीत १३० % वाढ केली आहे, तर गडचिरोलीसाठी १७ % वाढ केली आहे. राज्याचा अर्थसंकलप ५ लाख ४८ हजार कोटींचा आहे. त्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांना ३ लाख १७ हजार कोटी देण्यात आले, काँग्रेसच्या खात्यांना १ लाख ४४ हजार कोटी आणि शिवसेनेच्या खात्यांना ९० हजार १८१ कोटी देण्यात आले आहेत,
जिथे पगार जास्त द्यावा लागतो ती खाती राष्ट्रवादीकडे नाहीत, तर काँग्रेसकडे आहेत, तरीही अर्थमंत्री अजित पवारांनी सर्वाधिक निधी मात्र राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खात्यांनाच दिला आहे. अजित पवारांनी मागच्या वर्षीही तेच केले होते. अर्थसंकल्पातील ५७ % निधी राष्ट्रवादीने स्वतःकडे घेतला आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचे वाभाडे काढले आहेत.
Maharashtra Budget 2022 – ajit pawar gives 57% allocation to NCP ministers portfolios
महत्त्वाच्या बातम्या
- पिस्तुल बाळगणार्याला पोलिसांकडून बेड्या
- एकतर्फी प्रेमातून दहावीच्या मुलीवर चाकूने खुनी हल्ला
- मागासवर्गीय आयाेगाने मराठा समाजाचे सर्व्हेक्षण करण्याची मागणी शिवसंग्रामतर्फे मागासवर्गीय आयाेगाला लेखी पत्र – विनायक मेटे
- The Kashmir Files : गोवा, भिवंडीत “फिल्म जिहाद”; सिनेमा करमुक्त करण्याची महाराष्ट्र विधानसभेत मागणी!!