Maharashtra ATS : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी दोन जणांना 7 किलो युरेनियमसह अटक केली आहे. ठाण्यातून अटक करण्यात आलेले हे दोन्ही आरोपी मागच्या अनेक दिवसांपासून युरेनियमच्या विक्रीसाठी खरेदीदाराचा शोध घेत होते. जप्त केलेल्या युरेनियमची बाजारातील किंमत तब्बल 21 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. Maharashtra ATS seizes 7 kg uranium worth Rs 21 crore, arrests two From Thane
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी दोन जणांना 7 किलो युरेनियमसह अटक केली आहे. ठाण्यातून अटक करण्यात आलेले हे दोन्ही आरोपी मागच्या अनेक दिवसांपासून युरेनियमच्या विक्रीसाठी खरेदीदाराचा शोध घेत होते. जप्त केलेल्या युरेनियमची बाजारातील किंमत तब्बल 21 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
एटीएस आता तपास करतंय की, या युरेनियमचा वापर स्फोटके बनविण्यासाठी करण्यात आला होता का? मिळालेल्या माहितीनुसार, अबू ताहिर (31) आणि जिगर पांडे (वय 27) अशी आरोपींची नावे आहेत. एका खासगी लॅबमध्ये या मुद्देमालाची चाचणीही घेण्यात आली आहे.
युरेनियमचा वापर प्रामुख्याने अणुऊर्जा प्रकल्पात वीज निर्मितीमध्ये केला जातो. यामुळे प्रतिबंधित असलेले युरेनियम तेही एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोपींना कुठून उपलब्ध झाले? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. युरेनियमचा वापर लष्करी उद्देशानेही केला जातो. अशा परिस्थितीत, जर ते चुकीच्या हातात पडले, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
Maharashtra ATS seizes 7 kg uranium worth Rs 21 crore, arrests two From Thane
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांचे पाय खोलात, मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळली, देशमुख पुत्रांच्या 6 बनावट कंपन्याही CBIच्या रडारवर
- Oxygen Shortage : दिल्लीने मागितला 700 टन, प्रत्यक्षात दिला 730 मेट्रिक टन ऑक्सिजन, केंद्राची सुप्रीम कोर्टाला माहिती
- Bengal Violence : कधी थांबणार तृणमूलची गुंडगिरी? परराष्ट्र राज्यमंत्र्यांवरच जीवघेणा हल्ला, थोडक्यात बचावले मुरलीधरन
- केरळमध्ये चर्चचा वार्षिक कार्यक्रम ठरला सुपरस्प्रेडर, 110 पादरींना कोरोनाची लागण, 2 जणांचा मृत्यू
- जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या आसाराम बापूला कोरोनाची लागण, तब्येत खालावल्याने आयसीयूमध्ये केले दाखल