Maharashtra 12th result : राज्य शालेय शिक्षण मंडळामार्फत काही दिवसांपूर्वी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तथापि, आता दहावीनंतर बारावीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12 वीचा निकाल आज 3 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता जाहीर करण्यात आला आहे. आता हा बारावीचा निकाल तुम्ही पाहण्यासाठी पाच वेगवेगळ्या वेबसाइटस उपलब्ध आहेत. या वेळच्या निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळीही मुलींनीच बाजी मारल्याचं दिसून येत आहे. Maharashtra 12th HSC Board Results Announced Today See latest Updates
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य शालेय शिक्षण मंडळामार्फत काही दिवसांपूर्वी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तथापि, आता दहावीनंतर बारावीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12 वीचा निकाल आज 3 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता जाहीर करण्यात आला आहे. आता हा बारावीचा निकाल तुम्ही पाहण्यासाठी पाच वेगवेगळ्या वेबसाइटस उपलब्ध आहेत. या वेळच्या निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळीही मुलींनीच बाजी मारल्याचं दिसून येत आहे.
12वीच्या निकालाची वैशिष्ट्ये
बारावीच्या भरघोस निकाल; 46 विद्यार्थ्यांना 100%
गेल्या वर्षीचा निकाल 96.93 टक्के होता
विज्ञान 99.55
कला 99.83
वाणिज्य 99 .91
मुंबई, पुणे अव्वल; त्यातल्या त्यात कमी निकाल मराठवाड्यात
विभागवार निकालाची टक्केवारी
पुणे 99.75
नागपूर 99.62
औरंगाबाद 99.34
मुंबई 99.79
कोल्हापूर 99.67
अमरावती 99.37
नाशिक 99.61
लातूर 99.65
कोकण 99.63
46 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी, तर 12 जण काठावर पास
इयत्ता 12वीच्या परीक्षेत राज्यभरात पैकीच्या पैकी म्हणजेच 100 टक्के गुण मिळवणारे 46 टक्के विद्यार्थी आहेत. तर काठावर म्हणजेच 35 टक्क्यांवर उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या 12 आहे.
35 टक्के गुण मिळालेले 12 विद्यार्थी.
या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी एकाही शाळेचा किंवा ज्युनिअर कॉलेजचा निकाल यंदा 0 टक्के नाही. कला शाखेचा निकाल वाढला आहे. गेल्या वर्षीपेक्षा विज्ञान शाखेचा निकाल 2.52 टक्के जास्त लागला आहे. तर कला शाखेचा निकाल 17.20 टक्के जास्त लागला आहे. वाणिज्य शाखेचा निकाल 8.64 टक्के जास्त लागला आहे. उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमचा निकाल 12.93 टक्के अधिक लागला आहे.
बोर्डाने mh-hsc.ac.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांचे रोल नंबर आणि सीट नंबर जारी केले आहेत. (Maharashtra HSC Results 2021) कोरोनामुळे बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे देण्यात आली नाहीत. आता विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी, बोर्डाने HSC रोल नंबर / सीट नंबर तपासण्यासाठी लिंक अॅक्टिव्ह केली आहे.
Maharashtra HSC Results 2021: कसा चेक कराल रोल नंबर?
अधिकृत वेबसाइट mh-hsc.ac.in वर जा.
वेबसाइटवर गेल्यावर मुख्यपृष्ठावर, जिल्हा आणि तालुका निवडा आणि आपले नाव त्यात टाका.
रोल नंबरच्या तपशीलांसह एक यादी स्क्रिनवर दिसेल.
आपलं नाव आणि सीट नंबर तपासा आणि त्यानंतर तो नोट करुन ठेवा.
कसा पाहायचा निकाल?
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट ) घेता येईल. अधिकृत संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
1. https://hscresult.11 thadmission.org.in
2. https://msbshse.co.in
3. hscresult.mkcl.org
4. mahresult.nic.in. .
5. https://lokmat.news18.com
6. www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाशिवाय इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
Maharashtra 12th Results HSC Board Announced Today See latest Updates
महत्त्वाच्या बातम्या
- ब्रेकफास्ट रणनीती : पेगासस-महागाईवर राहुल गांधींनी विरोधकांसोबत आखली रणनीती, सायकलवरून गाठले संसद भवन
- जाता जात नाही ती जात : गुगलवर खेळाडूंची जात शोधताहेत लोक, साक्षी मलिक – पीव्ही सिंधूची जात शोधण्यात राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र- तेलंगण, बिहारचे लोक जास्त
- भाजप संसदीय गटाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले – संसद चालवू न देणे हा विरोधकांकडून लोकशाही आणि जनतेचा अपमान
- कोरोनाने जनता बेजार, पण दिल्लीच्या आमदारांना वाढवून पाहिजे पगार, केजरींच्या कॅबिनेट बैठकीत आज प्रस्ताव येण्याची शक्यता
- वसुली प्रकरणात आता डॉन छोटा शकीलची एंट्री, माजी आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध सुरू आहे चौकशी