• Download App
    राज्यात कडक लॉकडाउन लावा, नाहीतर पूर्णपणे सूट द्या; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची मुख्यमंत्री ठाकरेंना विनंती । Maha Health Minister Rajesh Tope Request To CM Thackeray on Lockdown in State

    राज्यात एकतर कडक लॉकडाउन लावा, नाहीतर पूर्णपणे सूट द्या; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची मुख्यमंत्री ठाकरेंना विनंती

    Health Minister Rajesh Tope : कोरोना महामारीची दुसरी लाट हळूहळू ओसरत असली तरी तिचा प्रभाव अद्यापही कायम आहे. राज्य सरकारनेही लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता आणून नियमावलीनुसार काही कामांना मुभा दिली आहे. आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लॉकडाऊनसंदर्भाने एक विनंती केली आहे. राजेश टोपे म्हणाले की, राज्यात एकतर कडक लॉकडाउन लागू करावा, नाहीतर पूर्णपणे सूट द्यायला हवी. Maha Health Minister Rajesh Tope Request To CM Thackeray on Lockdown in State


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोरोना महामारीची दुसरी लाट हळूहळू ओसरत असली तरी तिचा प्रभाव अद्यापही कायम आहे. राज्य सरकारनेही लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता आणून नियमावलीनुसार काही कामांना मुभा दिली आहे. आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लॉकडाऊनसंदर्भाने एक विनंती केली आहे. राजेश टोपे म्हणाले की, राज्यात एकतर कडक लॉकडाउन लागू करावा, नाहीतर पूर्णपणे सूट द्यायला हवी.

    नव्या कोरोना बाधितांची संख्या काही दिवसांपासून कमी आढळत आहे. याशिवाय शाळा सुरू करण्यावरही सरकारचा विचार सुरू आहे. परंतु लॉकडाऊनमध्ये पूर्णपणे सूट दिलेली नसल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी आहे. थिएटर्स, नाट्यगृहे अजूनही बंदच आहेत. व्यापाऱ्यांनाही ठरावीक वेळेतच व्यवसाय करण्याची मुभा आहे. यामुळे राज्यातील लॉकडाउन हटवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा, अशी विनंती राजेश टोपे यांनी केली आहे.

    राजेश टोपे म्हणाले की, जेथे कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत, तेथे निर्बंध लागू राहू द्यावे. पण जेथे कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी होत चालला आहे तेथे व्यापारासाठी पूर्णपणे परवानगी द्यावी. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अभ्यास करून आपला निर्णय लवकरच जाहीर करतील, असेही ते म्हणाले आहेत.

    Maha Health Minister Rajesh Tope Request To CM Thackeray on Lockdown in State

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Anmol Bishnoi : अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणण्याची तयारी; लॉरेन्सचा भाऊ बाबा सिद्दिकी आणि मूसेवाला हत्याकांडात वाँटेड

    Ajit Pawar : प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्याच्या प्रयत्नात असतो; शिवसेना शिंदे गटाच्या नाराजीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

    Anjali Damania : पार्थ पवारांचे जमीन घोटाळा प्रकरण, न्यायालयामध्ये जाण्याचा दमानियांनी दिला इशारा