Maha Govt Stopped Vaccination For 18 to 44 Age group : कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम सुरू आहे. परंतु महाविकास आघाडी सरकारने लसींचा तुटवडा असल्याचे सांगत अनेक लसीकरण केंद्रे बंद ठेवली आहेत. आता 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. 18 ते 44 वयोगटाच्या लसी या 45 वर्षांपुढील व्यक्तींसाठी वापरल्या जातील असेही त्यांनी सांगितले. Maha Govt Stopped Vaccination For 18 to 44 Age group Due To Shortage, Senior Citizens are Priority Says Rajesh Tope
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम सुरू आहे. परंतु महाविकास आघाडी सरकारने लसींचा तुटवडा असल्याचे सांगत अनेक लसीकरण केंद्रे बंद ठेवली आहेत. आता 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. 18 ते 44 वयोगटाच्या लसी या 45 वर्षांपुढील व्यक्तींसाठी वापरल्या जातील असेही त्यांनी सांगितले.
बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे…
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत असून, बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. 2 लाख टेस्टिंग राज्यात केले जात आहे. लसीकरण 1 कोटी 84 लाख झाले आहे. आता 35 हजार कोव्हॅक्सिन उपलब्ध आहे. राज्य शासनाने खरेदी केलेली 3 लाख कोव्हॅक्सिन 45 वर्षांवरील व्यक्तींना दिल्या जाणार आहेत, त्यांना दुसरा डोस देणे गरजेचं आहे. त्यामुळे हे डोस 45 पुढील वयोगटांना दिले जाणार आहेत, असं टोपे यांनी स्पष्ट केलं.
मंत्रिमंडळाच्या चर्चेनंतर पुढील निर्णय…
वय 18 ते 44 या वयोगटातील लस देण्याचे जाहीर केले होते. पण लशीचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. याशिवाय ज्यांनी आधीच पहिला डोस घेतलेला आहे, त्यांना वेळेवर दुसरा डोसही देणे गरजेचे आहे. यामुळे लसींचा तुटवडा पाहता 18 ते 44 या वयोगटातील लशीचा साठा हा 45 वरील वयोगटाकडे वळवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आहे. त्यामुळे 18 वर्षांवरील लसीकरणाचा वेग काही दिवस स्लोडाऊन करावा लागेल. टास्क फोर्स तसेच मंत्रिमंडळाच्या चर्चेनंतर पुढील निर्णय घेऊ, असेही राजेश टोपे म्हणाले.
दुसरीकडे, म्युकोरमायकोसिसचे रुग्ण काही जिल्ह्यांत आढळले आहेत. त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी लागणाऱ्या औषधांचा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचंही टोपेंनी स्पष्ट केलं.
Maha Govt Stopped Vaccination For 18 to 44 Age group Due To Shortage, Senior Citizens are Priority Says Rajesh Tope
महत्त्वाच्या बातम्या
- इटलीत नर्सने महिलेला नजरचुकीने एकाच वेळी दिले लसीचे 6 डोस, मग घडले असे काही…
- पलटवार : जेपी नड्डांचे सोनियांना पत्र, म्हणाले- महामारीच्या काळातील काँग्रेसचे वागणे जनता विसरणार नाही!
- शेतकरी आंदोलनातील गँगरेपचे प्रकरण : योगेंद्र यादवांना माहिती असून पोलिसांना सांगितले नाही, राष्ट्रीय महिला आयोगाने बजावली नोटीस
- मोठी बातमी : अमेरिकेत 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांनाही मिळणार कोरोनाची लस, फायझरच्या लसीला मंजुरी
- Daily Corona Cases in India : देशातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घट, मागच्या 24 तासांत 3.29 लाख नव्या रुग्णांची नोंद