• Download App
    धक्कादायक : मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या 281 डॉक्टरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, आत्महत्येची मागितली परवानगी । Maha 281 Doctors Working in tribal areas writes to CM Thackeray For permission to Suicide

    धक्कादायक : मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या 281 डॉक्टरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, आत्महत्येची मागितली परवानगी

    Doctors Working in tribal areas : नोकरीअभावी नैराश्यात येऊन आत्महत्या करणाऱ्या पुण्यातील स्वप्निल लोणकरचे प्रकरण सध्या चर्चेत असतानाच आता मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या 281 डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे. आरोग्यदूतांच्या या पत्राने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. Maha 281 Doctors Working in tribal areas writes to CM Thackeray For permission to Suicide


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : नोकरीअभावी नैराश्यात येऊन आत्महत्या करणाऱ्या पुण्यातील स्वप्निल लोणकरचे प्रकरण सध्या चर्चेत असतानाच आता मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या 281 डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे. आरोग्यदूतांच्या या पत्राने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

    आरोग्य विभागांतर्गत आदिवासी भागातील दुर्गम-अतिदुर्गम परिसरात तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या डॉक्टरांनी आत्महत्येची परवानगी मागितली आहे. दोन दशकांपासून सेवा बजावताना जिथे रस्तेही गेलेले नाहीत, तिथेही या डॉक्टरांनी आरोग्यसेवा पोहोचवली आहे. असेही असूनही मानधनवाढीचा फक्त निर्णय झाला, पण अंमलबजावणी अद्यापही झालेली नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

    अतिदुर्गम भागात जाऊन हे डॉक्टर गरोदर माता, कुपोषित बालके, किरकोळ आजार, साप-विंचू दंश अशा आजारांवर उपचार करतात. नक्षलग्रस्त भागात सेवा देणारे पोलीस आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता दिला जातो. मात्र, डॉक्टरांना वेठबिगारासारखे 24 हजार रुपये मानधनावर राबावे लागते, अशी व्यथा या 281 डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

    दरम्यान, राज्य शासनाने या डॉक्टरांना 24 ऐवजी थेट 40 हजार रुपये मानधनवाढीचा निर्णय 10 महिन्यांपूर्वी घेतलेला आहे. परंतु अद्यापही या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. डॉक्टरांनी याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे, तसेच आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्याशी पत्रव्यवहार करून निवेदने दिली आहे. तरीही शासन स्तरावर काहीच हालचाल होत नसल्याने हे आरोग्यदूत हताश झाले आहेत. यामुळे त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आत्महत्येची परवानगी मागितली आहे.

    Maha 281 Doctors Working in tribal areas writes to CM Thackeray For permission to Suicide

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य