• Download App
    बैलगाडी शर्यतीत बैल उधळले, रायगड जिल्ह्यातील नांदगाव येथील अपघातात तीन जण जखमी। ln bullak cart race Three persons were injured an accident at Nandgaon in Raigad district

    बैलगाडी शर्यतीत बैल उधळले, रायगड जिल्ह्यातील नांदगाव येथील अपघातात तीन जण जखमी

    विशेष प्रतिनिधी

    नांदगाव : रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे आयोजित करण्यात केलेल्या बैलगाडी शर्यती दरम्यान अपघात होवून तीन जण जखमी झाल्याची घटना घडली. शर्यतीचे बैल उधळल्याने ही घटना घडली. ln bullak cart race Three persons were injured an accident at Nandgaon in Raigad district

    महाराष्ट्राचा पारंपारिक खेळ असलेल्या बैलगाडी शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली. त्यामुळे शर्यतीचा मार्ग मोकळा झाला. राज्यात आता विविध ठिकाणी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात येत आहे. रायगडमध्ये सुद्धा एका बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, या बैलगाडा शर्यतीत मोठी दुर्घटना घडली आहे.



    सदर स्पर्धेचे उद्घाटन आमदार महेंद्र दळवी, भाजपा जिल्हा अध्यक्ष ॲड महेश मोहिते, काँग्रेसचे युवा नेते राजेंद्र ठाकूर यांच्या उपस्थित करण्यात आले होते. आमदार महेंद्र दळवी म्हणाले की सात वर्षाने बैलगाडी शर्यतीला परवानगी दिली. नांदगाव याठिकाणी बैलगाडी दुर्घटना झाली यावेळेस मी उपस्थित होतो.

    बैलगाडी शर्यतीचे आयोजन समुद्रकिनारी करण्यात आले होते. अनेक स्पर्धा यशस्वीपणे पार पडतात, मात्र हा अपघात घडला आहे. शेतकऱ्यांचे पारंपरिक पशुधन टिकावे यासाठी शर्यतीला दिलेली परवानगी स्वागतार्ह आहे. बैलगाडी शर्यत सुरू होताच अचानक एक बैलगाडी प्रेक्षकांमध्ये घुसली त्यामुळे हा अपघात झाला. बैलगाडी शर्यतीचे आयोजन करताना नियम व अटींचे जनतेने पालन करावे, भविष्यात आशा दुर्घटना घडू नये याची पुरेपूर खबरदारी घेतली जाईल असे आमदार महेंद्र दळवी म्हणाले.

    ln bullak cart race Three persons were injured an accident at Nandgaon in Raigad district

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस