Friday, 9 May 2025
  • Download App
    वानखेडे यांची नोकरी जातेय का मलिकांचे मंत्रीपद हेच बघू, रामदास आठवले यांचे आव्हान|Let's see if Wankhede's job goes or Malik's ministerial post, Ramdas Athavale's challenge

    वानखेडे यांची नोकरी जातेय का मलिकांचे मंत्रीपद हेच बघू, रामदास आठवले यांचे आव्हान

    विशेष प्रतिनिधी

    कऱ्हाड : अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) अधिकारी समीर वानखेडे यांचीनोकरी की, अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नबाबमलिकांचे मंत्रिपद जातयं हे पाहुया असे आव्हान केंद्रीय समाजकल्याण राज्य मंत्री रामदास आठवले यांनी दिले आहे.Let’s see if Wankhede’s job goes or Malik’s ministerial post, Ramdas Athavale’s challenge

    कऱ्हाड येथे पत्रकार परिषदेत बोलताना आठवले म्हणाले, राष्ट्रीय स्तरावरील यंत्रणांकडून राज्यात कारवाया होत असल्यातरी त्यातून शरद पवार यांच्या कुटुंबाला अथवा कुणालातरी त्रास देण्याचा उद्देश नाही. या यंत्रणा पूर्णत: स्वतंत्र असून, त्यांच्या कारवाईंमध्ये केंद सरकारच्या हस्तक्षेपाचा संबंधच येत नाही.



    अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) अधिकारी समीर वानखेडे यांची नोकरी जाईल, त्यांना तुरूंगात पाठवू या राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे अल्पसंख्याक कल्याणमंत्री नवाब मलिक यांच्या इशाऱ्याबाबत आठवलेंनी वानखेडेंची नोकरी की, मलिकांचे मंत्रिपद जातयं हे पाहुया असे आव्हानच दिले.

    सुशांत रजपूत याच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीतील अंमली पदार्थाच्या मोठ्या प्रमाणातील सेवनाचा मुद्दा समोर आला. आर्यन खानवरील कारवाईत बिलकुल पक्षपातीपणा नसून, त्याच्या विरोधात भक्कम पुरावे असल्यानेच न्यायालय त्याला जामीन देत नसावे. सक्त वसूली संचालनालय, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग, अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या छापेमारीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई ही होणारच असल्याचे आठवले म्हणाले.

    शेतक-यांच्या म्हणण्यानुसार कृषी कायदे मागे घेतले तर आंदोलनांमधून अनेक कायदे मागे घेण्याची मागणी होईल. त्यामुळे कायद्याला अर्थच राहणार नाही. आम्हाला आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांबाबत सहानुभूती असून, केंद्र सरकार चर्चेस तयार आहे. तरी, याचा फायदा आंदोलकांनी करून घ्यावा. केंद्राच्या कृषी कायद्याने कुणाच्याही जमिनी गहाण राहणार नाहीत. शेतक-यांचा तोटा होणार नसल्याचा दावा आठवले यांनी केला.

    Let’s see if Wankhede’s job goes or Malik’s ministerial post, Ramdas Athavale’s challenge

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला

    CM Fadnvis : सायबर गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक – मुख्यमंत्री फडणवीस

    Devendra Fadnavis : महाराष्ट्र शासन अन् विधि सेंटर फॉर लिगल पॉलिसी यांच्यात सामंजस्य करार