• Download App
    बिबट्या मादीचे बछड्यासह दर्शन इगतपुरीत नागरिकांमध्ये उडाली घबराट|lepord is seen along with cubs in Igatpuri city

    बिबट्या मादीचे बछड्यासह दर्शन इगतपुरीत नागरिकांमध्ये उडाली घबराट

    विशेष प्रतिनिधी

    इगतपुरी : इगतपुरी शहरातील सेंट्रल रेल्वेच्या सिनिअर इन्स्टिट्यूट, पोर्टर चाळ, आरपीएफ ब्यारेक, गावठाण परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरु आहे.सेंट्रल रेल्वेच्या सिनिअर इन्स्टिट्यूट येथे काल रात्री अकराच्या सुमारास बिबट्याने आपल्या३ बछड्यासह पुन्हा दर्शन दिल्याने परिसरात दहशत पसरली.lepord is seen along with cubs in Igatpuri city

    कामावरून येत असताना युवकाने हा व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये कैद केला आहे. तत्काळ पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे,अशी मागणी होत आहे.इगतपुरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे.



    हा परिसर वर्दळीचा असून या पूर्वीही अनेकदा रात्री कामावर जाणाऱ्या नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले होते. पिंजरे लावले असतानाही बिबट्या पिंजऱ्यात अडकला नाही. कामगार, शेतकरी वर्ग, विद्यार्थी धास्तावले आहेत.नागरिक बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी करत आहे.

    •  बिबट्या मादीचे बछड्यासह दर्शन घडले
    •  सेंट्रल रेल्वेच्या सिनिअर इन्स्टिट्यूट येथेघडले
    • युवकाकडून मोबाईलमध्ये बिबट्याचे चित्रीकरण
    • नागरिकांमध्ये पसरली घबराट
    • तातडीने पिंजरा लावण्याची नागरिकांची मागणी

    lepord is seen along with cubs in Igatpuri city

    Related posts

    अजितदादांचा राजकीय वारस एकटे पवार निवडू शकतील, की त्या निवडीत मोदी + शाहांचा वाटा सिंहाचा असेल??

    अजितदादांना निरोप देताच राजकीय वारसाचा प्रश्न ऐरणीवर; सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार यांचे राजकीय भवितव्य आले विशिष्ट निर्णायक वळणावर!!

    आमच्या बारामतीकरांचा माज गेला; दादांच्या आठवणी सांगताना कार्यकर्त्याचे शब्द!!