प्रतिनिधी
मुंबई : बारामती तालुक्यातील कुरण मध्ये बिबट्या सफारी पार्क उभारण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. पण हा निर्णय घेताना आधीचा जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथे सफारी पार्क करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने फिरवला होता. आता शिंदे फडणवीस सरकारने आघाडी सरकारचा निर्णय पुन्हा फिरवून बिबट्या सफारी पार्क बारामती तालुक्यात नव्हे तर पुन्हा जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथेच उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
Leopard Safari Park is not in Baramati, but in Ambegwan in Junnar Taluk
पुणे जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आज मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत राजगुरूनगर पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारत बांधणीसाठी जागा निश्चिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच पुणे जिल्ह्यातील तुळापूर वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समधीस्थळाचा विकास करून त्याला स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार धर्मवीर संभाजी महाराज समाधीस्थळ हेच नाव कायम ठेवण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासोबतच बारामती तालुक्यातील कुरण गावात प्रस्तावित असलेले बिबट्या सफारी पार्क हे जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथेच तयार करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
याशिवाय हिरडा या औषधी वनस्पतीचे उत्पादन करणाऱ्या श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा सहकारी उत्पादक संस्थेचे थकीत कर्ज भरण्यासाठी २ कोटी एवढी रक्कम विशेष बाब म्हणून देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव आणण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.
याप्रसंगी शिरूर मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनावणे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, संबंधित विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी तसेच राजगुरूनगर आणि तुळापूर बुद्रुक गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
Leopard Safari Park is not in Baramati, but in Ambegwan in Junnar Taluka
महत्वाच्या बातम्या
- वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प : सुभाष देसाई आधी काय म्हणाले?, आज काय म्हणाले?; नितेश राणेंनी केले ट्विट!!
- ईडीची धडक कारवाई : मुंबईतल्या झवेरी बाजारातून तब्बल 92 किलो सोन्यासह 330 किलो चांदी जप्त!
- मुंबईसह सर्व महापालिकांमध्ये मनसे, तर ग्रामीण भागात शेट्टींची स्वाभिमानी स्वतंत्र लढणार!!
- सांगलीत 4 साधूंना मारहाण : फडणवीसांचा रशियातून पोलीस महासंचालकांना फोन; मागविला रिपोर्ट!!