Tuesday, 6 May 2025
  • Download App
    Legislative council ex President prof N.S.Farande biography memory book Deepstambha inaugration by opposition leader Devendra Fadanvis in pune

    प्रा.ना.स.फरांदे यांचा मूल्याधिष्ठित राजकारणावर भर – देवेंद्र फडणवीस

    प्रतिनिधी

    पुणे : समरसतेच्या आधारावर भारतीय जनता पक्षाची उभारणी करताना प्रा. ना. स. फरांदे यांनी दिलेले योगदान दीपस्तंभा प्रमाणे होते, त्यांनी मूल्याधिष्ठित राजकारण केले, त्यांचे कार्य कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गगार विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले. Legislative council ex President prof N.S.Farande biography memory book Deepstambha inaugration by opposition leader Devendra Fadanvis in pune

    ‘दीपस्तंभ’ या विधानपरिषदेचे माजी सभापती प्रा. ना. स. फरांदे यांच्या जीवनावरील स्मृतिग्रंथाचे प्रकाशन करताना फडणवीस बोलत होते. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील ,खासदार प्रकाश जावडेकर, ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक, माजी खासदार प्रदीप रावत, माजी आमदार योगेश टिळेकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत फरांदे, कार्याध्यक्षा हर्षदा फरांदे, विश्वस्त मंगला फरांदे यावेळी उपस्थित होते.

    फडणवीस म्हणाले, समरसता आणि समता यात बुद्धिभेद करण्याचे काम केले जात आहे. समता हे उद्दिष्ट आहे, तर समरसता हे त्याकडे पोहोचण्याचा मार्ग आहे. समरसतेच्या आधारावर पक्ष उभा करण्याचे आणि सर्वसमावेशकता आणण्याचे काम भाजपने केले. पक्षाचा राज्यातील चेहरा एक, मात्र त्याला निर्णयाचे कोणतेही अधिकार नाहीत, तर महत्त्वाचे निर्णय दिल्लीतून घ्यायचे यापेक्षा वेगळी कार्यपद्धती भाजपने अंगिकारली त्यामुळे पक्षाचा सर्वच क्षेत्रांत विकास झाला.

    पाटील म्हणाले, फरांदे यांनी भाजपची विचारधारा ही बहुजनांच्या हिताचीची आहे, राष्ट्राच्या कल्याणासाठीच आहे हे ठामपणे सांगण्याचे धैर्य दाखवले. भाजपवरील विशिष्ट जातींचा पक्ष हा शिक्का पुसून काढण्यासाठी फरांदे यांच्यासारख्या नेत्यांनी दाखवलेली जिद्द प्रशंसनीय होती. त्यांच्या सारख्या कार्यकर्त्यांमुळेच पक्ष आज यशोशिखरावर येऊन पोहोचला आहे. उत्तुंग व्यक्तिमत्वाकडून पक्ष घडला.

    पतंगे म्हणाले, मैत्री, करुणा, आनंद, उपेक्षा या मनोभावांच्या आधारे कुठलेही काम करावे हा समरसतेचा मंत्र आहे. सुरक्षा, सन्मान, सहभाग, प्रतिनिधित्व, नेतृत्व असा विचार जातीपातींचे समूह करीत असतात. राजकीय समरसतेसाठीत्या आधारे विचार करून संघर्ष करणारे, समाज उत्थानाचे दीर्घकालीन कार्य करू शकणारे नेतृत्व विकसित करण्याची गरज आहे.

    Legislative council ex President prof N.S.Farande biography memory book Deepstambha inaugration by opposition leader Devendra Fadanvis in pune

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याचे महायुतीचे धोरण, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

    अहिल्यादेवींच्या जीवन चरित्रावर भव्य चित्रपट निर्मिती; चौंडी मध्ये फडणवीस मंत्रिमंडळाच्या ऐतिहासिक बैठकीत निर्णय!!

    Devendra Fadnavis आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री फडणवीस