• Download App
    मुख्यमंत्री आहे असे आजही वाटते - देवेंद्र फडणवीस | Leader of Opposition Devendra Fadnavis said he still thinks that he is a Chief minister

    मुख्यमंत्री आहे असे आजही वाटते – देवेंद्र फडणवीस

    विशेष प्रतिनिधी

    बेलापूर: आज बेलापूरमध्ये महिला मासळी विक्रेत्यांना परवाना वाटप करण्याचा कार्यक्रम झाला. हे वाटप देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. विरोधी पक्षनेते (विधानपरिषद) देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मासळी विक्री करणाऱ्या महिलांना परवाना देण्याच्या कार्यक्रम झाला.

    Leader of Opposition Devendra Fadnavis said he still thinks that he is a Chief minister

    याठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी मला आजही मुख्यमंत्री असल्याचे वाटते असे वक्तव्य केले. या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

    आपल्या काळामध्ये आपण सर्व महिलांना चांगले वातावरण, चांगल्या सोयीसुविधा मिळाव्या यासाठी अनेक योजना अंमलात आणल्या, आणि ताईंच्या (भाजप आमदार मंदा म्हात्रे) कामामुळे महिलांना चांगला फायदा होईल असा त्यांना विश्वास आहे. नवी मुंबईमध्ये ताई अथवा गणेश नाईक यांनी या शहराचा विकास केला. हे शहर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये अग्रभागी राहिले आहे. हे सगळ्यात स्वच्छ शहर म्हणून ओळखले जाते.


    Uddhav Thackeray and Devendra Fadanavis in Kolhapur : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा गावाबाहेर राहूनच नरसिंहवाडीच्या पूरग्रस्तांची संवाद; फडणवीस मात्र भर पाण्यात नरसिंहवाडीत


    सर्वात तरुण व हसतमुख मुख्यमंत्री म्हणून टोल, इबीसी संदर्भातील चांगले निर्णय घेतले. आदिवासी शाळांत इ लर्निंग, मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी नॉनक्रिमिलेअर मर्यादेत सहा लाखांपर्यंत वाढ असे समाजोपयोगी निर्णय झाले. नागरीक त्यांच्या या सर्व आघाड्यांवर घेतलेल्या निर्णयामुळे समाधानी होते.

    येणाऱ्या निवडणूकीत जनतेचा आशिर्वाद पुन्हा मिळेल व नवी मुंबईची सेवा करण्यासाठी आमचे नेते व कार्यकर्ते नेहमीच तयार असतील असे त्यांना वाटते आणि यामुळेच त्यांना अजून आपण मुख्यमंत्री आहोत असे वाटते. गणेश नाईक, आ.मंदा म्हात्रे, पाटीलसाहेब यांच्या मुळे त्यांना मुख्यमंत्री नाही असे कधी जाणवले नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार ते आजही मुख्यमंत्री असल्याचे त्यांना वाटते. ते म्हणाले, “तुम्ही मला कसलीही कमतरता जाणवू दिली नाहीत. मनुष्याचे पद महत्वाचे नसून त्याचे कार्य महत्त्वाचे आहे.” मी घरात एक दिवस पण न थांबता गेले दोन वर्षे जनतेची सेवा करतो आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री नाही असे जनतेने कधीच जाणवू दिले नाही. मी विरोधी पक्षनेते म्हणून उत्कृष्ट काम करत आहे असेही ते म्हणाले.

    Leader of Opposition Devendra Fadnavis said he still thinks that he is a Chief minister

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस