विशेष प्रतिनिधी
पुणे : लवासा प्रकल्पात शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना विशेष स्वारस्य होते त्यांच्या प्रभावातून प्रकल्पाला विविध परवानग्या देण्यात आल्या, अशा शब्दांमध्ये मुंबई हायकोर्टाने ताशेरे ओढल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचा जुना महत्त्वाकांक्षी वक्तव्याची एक आठवण जागी झाली आहे.Lavasa hill station: 26 projects like Lavasa possible; Remembering Pawar’s “ambitious” statement
लवासा प्रकल्प दिवाळखोरीत जाऊन त्याच्या खरेदीची बोली लावण्याच्या शेवटच्या दिवशी २० नोव्हेंबर २०२० तशी बोली लावायला कोणीही पुढे आलेले नव्हते. त्याचवेळी एका बातमीची जोरदार चर्चा सुरू झाली होती, ती म्हणजे शरद पवारांना राज्यात लवासासारखे आणखी २६ प्रकल्प उभारायचे होते, या बातमीची…!!
राज्यात लवासा सिटीसारखे २६ प्रकल्प होऊ शकतात, असे विधान शरद पवार यांनी केले होते. उलट विकासाच्या आड येणाऱ्यांना माध्यमांनी प्रसिद्धी देऊन नये, असे आवाहनही त्यांनी 23 जून २०१४ ला केले होते.
त्यावेळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चरच्या (एमसीसीआयए) ८० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर चंचला कोद्रे, यश बँकेचे व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर, एमसीसीआयएचे अध्यक्ष एस. के. जैन, उद्योजक सतीश मगर, आनंद सरदेशमुख आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले होते, की लवासामध्ये सुटीच्या दिवशी सुमारे १० हजार लोक भेट देत असतात. त्यामुळे ते पर्यटनाचे ठिकाण झाले आहे. राज्यात लवासा सारखे २६ पर्यटन प्रकल्प होऊ शकतात. त्या ठिकाणी पाणी आणि जागा ताब्यात घेण्याची समस्या नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले होते.
मात्र, कोणताही प्रकल्प सुरू करायचा झाल्यास लगेच विरोध केला जातो. विकासाच्या आड येणाऱ्या अशा घटकांना माध्यमांनी प्रसिद्धी देऊ नये, असेही पवार म्हणाले होते. त्यावेळी पवारांनी एन्रॉन प्रकल्पाचा दाखला दिला होता. सुरवातीला एन्रॉन प्रकल्पाला विरोध झाला. पण तो चार वर्षांपूर्वी सुरू करण्यात आल्याचे पवार यांनी नमूद केले होते.
मात्र, लवासाचा पहिलाच प्रकल्प २०१८ मध्ये दिवाळखोरीत गेला. त्याच्यावरचे 17 बॅकांनी मिळून ६ हजार २२५ कोटी रुपयांचे कर्ज दिले ते फेडता आलेले नाही. लवासात बॉन्डच्या आणि घर खरेदीच्या स्वरूपात लवासामधे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या काही हजारांमध्ये आहे. या गुंतवणूकदारांची देणी भागवण्यासाठी लवासा प्रकल्पातील मालमत्तांची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अशा वेळी शरद पवार कोठे होते? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
मुंबई हायकोर्टाने शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्या आरोपांमध्ये सत्य असल्याचे ताशेरे ओढल्याच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा महाराष्ट्रात लवासा सारखे 26 प्रकल्प उभारणे शक्य असल्याच्या शरद पवारांच्या “महत्त्वाकांक्षी” विधानाची आठवण झाली.
Lavasa hill station: 26 projects like Lavasa possible; Remembering Pawar’s “ambitious” statement
महत्त्वाच्या बातम्या
- यूपी’मध्ये पाचव्या टप्प्यातील ६१ जागांसाठी मतदानाला सुरुवात
- आता घे पायताण आणि घाल माझ्या डोक्यात”, पत्रकार परिषदेतील ‘या’ प्रश्नावर अजित पवार भडकले!
- इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याकडे मागितली 10 लाखांची खंडणी, आरोपीला चतुःशृंगी पोलिसानी ठोकल्या बेड्या
- Lavasa city : लवासा प्रकरणी पवारांवरच्या आरोपांमध्ये जर तथ्यच; तर बांधकामे का नाही पाडायची?; याचिकाकर्ते जाधव सुप्रीम कोर्टात जाणार!!