अमृती फडणवीस यांनी ट्विट करत आपल्या गाण्याची घोषणा केली होती. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं, आओ कुछ तुफानी करते है, कल शाम… मी पुन्हा येत आहे !!! असं म्हटलं होतं. Launch of Amrita Fadnavis’s new song ‘Man Hi Man Tujhe Chaha’; Great response from fans
विशेष प्रतिनिधी
मुंबई : गेली अनेक वर्षे मिसेस मुख्यमंत्री म्हणून असलेली ओळख अमृता फडणवीसांनी बदलली आहे. अमृता फडणवीस या एक गायिका असून त्यांच्या आवाजातील अनेक गाणी प्रदर्शित झाली आहेत. अमृता फडणवीस या नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात.
काल अमृता फडणवीस यांनी आपल्या फेसबूक पेजवर नवं गाणं लॉन्च केलं आहे. अमृती फडणवीस यांनी ट्विट करत आपल्या गाण्याची घोषणा केली होती. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं, आओ कुछ तुफानी करते है, कल शाम… मी पुन्हा येत आहे !!! असं म्हटलं होतं.
इंटरनेट सेन्सेशन ठरलेली श्रीलंकन गायिका योहानी दिलोका डी सिल्वाने गायलेलं ‘मानिके मागे हिते’ या गाण्यावर आधारित हे गाणं असून ‘मन ही मन तुझे चाहा…’ अशी या गाण्याची सुरुवात आहे.
अमृता फडणवीस यांनी ‘मन ही मन तुझे चाहा…’ गायलेल्या गाण्याला चाहत्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.