• Download App
    लातूर : एसटी महामंडळाने जिल्ह्यातील १८६ कर्मचारी केले निलंबित। Latur: ST Corporation suspends 186 employees in the district

    लातूर : एसटी महामंडळाने जिल्ह्यातील १८६ कर्मचारी केले निलंबित

    राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ करून देखील कर्मचारी त्यांच्या विलीनीकरण निर्णयावर ठाम आहेत. Latur: ST Corporation suspends 186 employees in the district


    विशेष प्रतिनिधी

    लातूर : लातूर जिल्ह्यात सुरू असलेले एसटी कर्मचाऱ्यांच आंदोलन अद्यापही सुरू आहे.लातूर जिल्ह्यातील आता निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या १८६ झाली आहे.विलीनीकरण जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असा निर्धार एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांनी केला आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ करून देखील कर्मचारी त्यांच्या विलीनीकरण निर्णयावर ठाम आहेत.

    दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर देखील एसटी कर्मचारी संपावर ठाम असल्याने एसटी महामंडळाकडून विभागीय नियंत्रकांना कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचे थेट आदेश देण्यात आले आहे. यावेळी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना निलंबनाऐवजी थेट बडतर्फच्या कारवायाचे संकेत दिले आहे.



    दरम्यान काल ११६ एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यापूर्वी ७० कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. आता निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या १८६ झाली आहे. तुटेपर्यत ताणू नये, असे एसटी महामंडळ प्रशासनाचे मत आहे. इतर कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन एसटीचे विभागीय नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी यावेळी केले आहे.

    Latur: ST Corporation suspends 186 employees in the district

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Malegaon sugar factory election result 2025 अजितदादांना नको असलेले चंद्रराव तावरे विजयी; माळेगावच्या कारखान्यात चालणार नाही मनमानी!!

    Jio Adani Partnership : जिओ पंपांवर मिळेल अदानींची CNG; अदानी गॅस स्टेशनवर जिओच्या पेट्रोल-डिझेलची विक्री, ATGL-रिलायन्स BPची भागीदारी

    Eknath Khadse : एकनाथ खडसे म्हणाले- मी आधीही आणीबाणीच्या विरोधात; राष्ट्रवादीमध्ये राहून मी संघाचे काम करतो!