दोन महिन्यापूर्वी त्यांनी रितसर अर्ज करीत प्रसूती रजा घेतली होती. सारिका कोद्रे-लाड यांची २५ दिवसापूर्वी डिलिव्हरीही झाली आहे.Latur: A female carrier on maternity leave was also suspended
विशेष प्रतिनिधी
लातूर : मागील एक महिन्यापासून एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.दरम्यान एसटी कर्मचारी आंदोलनातून माघार घेत नसल्याने आता महामंडळाने निलंबनाच्या कारवाईचा मार्ग स्वीकारला आहे.आत्तापर्यंत जवळपास ९००० कर्मचाऱ्यांच निलंबन देखील केलं आहे.
दरम्यान लातूर तालुक्यातील मुरुड इथे राहणाऱ्या सारिका कोद्रे-लाड या लातूर डेपोमध्ये महिला वाहक म्हणून गेल्या १६ वर्षांपासून सेवा बजावीत आहेत. दोन महिन्यापूर्वी त्यांनी रितसर अर्ज करीत प्रसूती रजा घेतली होती. सारिका कोद्रे-लाड यांची २५ दिवसापूर्वी डिलिव्हरीही झाली आहे. मात्र गैरशिस्तपणाचा ठपका ठेवत एसटी महामंडळाने त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.
सारिका कोद्रे यांना निलंबनाच्या आदेशामुळे आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे.प्रसूती रजा दिल्यानंतरही अशा पद्धतीचे निलंबनाचे आदेश ज्यांनी काढले आहेत त्यांच्यावरच कारवाई करण्याची मागणी एसटी वाहक सारिका कोद्रे यांनी केली आहे.
पुढे सारिका कोद्रे म्हणाल्या की माझ्यावरती कोणत्या अधिकाऱ्यांने आणि कशा पद्धतीने कारवाई केली आहे ते महामंडळाने मला सांगावे.तसेच माझ्यावरती चुकीची कारवाई करणाऱ्या संबंधीत अधिकाऱ्यांवरती त्वरीत कारवाई करावी .