• Download App
    Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा, पण आणखी काही दिवस आयसीयूमध्येच राहणार|Lata Mangeshkar Lata Mangeshkar condition improves, but she will remain in ICU for a few more days

    Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा, पण आणखी काही दिवस आयसीयूमध्येच राहणार

    गानसम्राज्ञी लता मंगेशकर काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहेत. लता मंगेशकर यांना न्यूमोनिया आणि कोविडची लक्षणे आढळल्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टर आणि कुटुंबीयांकडून दररोज अपडेट्स येत असतात. आता त्यांच्या प्रकृतीबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. लता दीदींच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. तरीही आणखी काही दिवस त्या आयसीयूमध्येच राहणार आहेत.


    प्रतिनिधी

    मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहेत. लता मंगेशकर यांना न्यूमोनिया आणि कोविडची लक्षणे आढळल्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टर आणि कुटुंबीयांकडून दररोज अपडेट्स येत असतात.Lata Mangeshkar condition improves, but she will remain in ICU for a few more days

    आता त्यांच्या प्रकृतीबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. लता दीदींच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. तरीही आणखी काही दिवस त्या आयसीयूमध्येच राहणार आहेत. त्यांच्याबद्दल खोट्या अफवा पसरवू नका आणि त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करा, असे आवाहन त्यांच्या निकटवर्तीयांनी केले आहे.



    लता मंगेशकर यांना ८ जानेवारी रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 92 वर्षीय लता मंगेशकर तेव्हापासून ICU मध्ये दाखल आहेत. त्या बऱ्या व्हाव्यात आणि घरी परताव्यात यासाठी जगभरातील चाहते प्रार्थना करत आहेत.

    नुकतेच शनिवारी लता दीदींच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करण्यात आले, लता दीदींच्या प्रकृतीबद्दल खोट्या बातम्या देऊ नका, अशी मनापासून विनंती. ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील डॉ. समदानी यांचे अपडेट आले आहे की, लता दीदी आता सकारात्मक लक्षण दर्शवत आहेत आणि त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे.

    Lata Mangeshkar Lata Mangeshkar condition improves, but she will remain in ICU for a few more days

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!

    Maharashtra : महाराष्ट्रातील 10 हजार महिलांना पिंक ई-रिक्षा वाटप; नागपूरमधून योजनेला सुरुवात

    Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- राज्यात कुठेही हिंदी लादली जात नाही; भारतीय भाषेला विरोध करून इंग्रजीचे गोडवे गाण्याचे वाईट वाटते