• Download App
    मंत्रिमंडळाच्या अखेरच्या बैठकीत रंगले नाराजीनाट्य; अजित पवार आणि नितीन राऊत यांच्यात जोरदार वाद|last meeting of the Cabinet Strong argument between Ajit Pawar and Nitin Raut

    मंत्रिमंडळाच्या अखेरच्या बैठकीत रंगले नाराजीनाट्य; अजित पवार आणि नितीन राऊत यांच्यात जोरदार वाद

    प्रतिनिधी

    मुंबई : महाविकास आघाडी सरकार अखेरच्या घटका मोजत असतानाच मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत काही मंत्र्यांमध्ये जोरदार वाद होऊन नाराजीनाट्य रंगले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत एकमेकांना भिडल्याचे समोर आले आहे.last meeting of the Cabinet Strong argument between Ajit Pawar and Nitin Raut

    काँग्रेसचे नेते मावळते ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राष्ट्रवादीचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या विभागाच्या फाइल्स रोखल्याचा आक्षेप घेतला. या आरोपाला अजित पवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. तुमची एकेक फाईल 20 ते 25 हजार कोटींची असताना ती कशी मंजूर करू? असा सवाल पवारांनी उपस्थित केला. एवढ्या मोठ्या खर्च आणि तरतुदींवर संपूर्ण चर्चा झाल्याशिवाय फाईल मंजूर करायच्या? असा प्रतिप्रश्‍नही त्यांनी केला. औरंगाबाद, उस्मानाबाद आणि पुणेच्या नामांतराचे प्रस्ताव मांडत मंत्र्यांनी आग्रही भूमिका घेतल्याने अजित पवार संतप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले.



    अजित पवार म्हणाले, ही मंत्रिमंडळ बैठक आहे, सहकारी संस्थेची बैठक नाही. ‘संभाजीनगर’ आणि ‘धाराशिव’च्या मागणीला मान्यता मिळाल्यानंतर काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांनी पुण्याचे नामांतर ‘जिजाऊनगर’ असे करा, अशी मागणी केली. यावर ‘जिजाऊनगर’ असे नामांतर करण्यास विरोध नाही;

    पण आम्हा पुण्याच्या मंत्र्यांना तरी विचारून प्रस्ताव आणा, अशी भावना त्यांनी व्यक्‍त केली. औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेस विरोध करेल, अशी शक्यता व्यक्‍त केली जात होती; पण छत्रपती संभाजीराजे यांच्या नावाला विरोध करायचा नाही, अशी भूमिका आधीच काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आली होती. त्यामुळे कोणत्याही विरोधाशिवाय हा प्रस्ताव मंजूर झाला.

    last meeting of the Cabinet Strong argument between Ajit Pawar and Nitin Raut

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना