• Download App
    उत्तरेकडील राज्यातून बटाट्याची मोठी आवक, दर कोसळले; जनतेची चांदी, कांदाही झाला स्वस्त । Large imports of potatoes from the northern states, rates fell; Relieves Consumers ; onion also became cheaper

    उत्तरेकडील राज्यातून बटाट्याची मोठी आवक, दर कोसळले; जनतेची चांदी, कांदाही झाला स्वस्त

    वृत्तसंस्था

    पुणे : उत्तरेकडील राज्यांतून बटाट्याची मोठी आवक झाली आहे. त्यामुळे दर कमी झाले आहेत. तसेच कांदाही आवाक्यात आल्याने जनतेची चांदी झाली आहे. Large imports of potatoes from the northern states, rates fell; Relieves Consumers ; onion also became cheaper

    उत्तरेकडील आग्रा, मध्यप्रदेश भागात बटाट्याची मोठी लागवड केली जाते. बटाट्यापाठोपाठ कांद्याच्या दरातही घट झाली आहे. शेतकऱ्यांकडून जुना कांदा राज्यातील घाऊक बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. आवक वाढल्यामुळे कांदा-बटाटा स्वस्त झाला आहे. ग्राहकांनाही दिलासा मिळाला आहे. नवीन कांद्याचा हंगाम एक-दीड महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुना साठवणुकीतील कांदा बाजारात पाठविला आहे.

    उत्तरेकडील राज्यातून मोठी आवक

    उत्तरेकडील आग्रा, मध्यप्रदेश भागात बटाट्याची मोठी लागवड केली जाते. शेतकरी बटाटा शीतगृहात साठवितात. बटाटा साठवणुकीचे करार नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात संपतात. त्यानंतर नवीन बटाट्याचा हंगाम सुरू होतो. अशा परिस्थितीत बटाटा साठवणूक करणे अयोग्य ठरते. त्यामुळे उत्तरेकडील राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर बटाटा विक्रीस पाठवित आहेत. घाऊक बाजारात एक किलो बटाट्याला १० ते १३ रुपये असा दर मिळत आहे.



    शेतकऱ्यांनाही फायदा

    नवीन कांदा-बटाट्याचा हंगाम दोन- तीन महिन्यात सुरू होईल. त्यामुळे कांदा-बटाट्याची साठवण करणे परवडणार नाही. कांदा निर्यातीला फार चालना नाही. त्यामुळे जुना कांदा-बटाटा विक्रीस पाठविण्यास सुरुवात केली आहे. आवक वाढल्यामुळे किरकोळ बाजारातील कांदा, बटाट्याचे दरही उतरले आहेत. घाऊक बाजारातील दरात मोठी घसरण नसल्याने शेतकऱ्यांनाही समाधानकारक दर मिळत आहेत.

    पुणे जिल्हयातील शिरूर, खेड, जुन्नर, नाशिकमधील सिन्नर, संगमनेर भागातील शेतकरी कांदा चाळीत साठवितात. या साठवणुकीतील जुन्या कांद्याची आवक चांगली आवक बाजारात होत आहे. जुन्या कांद्याला परराज्यातून मागणी नाही. त्यामुळे कांद्याचे दर उतरले आहेत.

    – रितेश पोमण, कांदा व्यापारी, मार्केटयार्ड

    Large imports of potatoes from the northern states, rates fell; Relieves Consumers ; onion also became cheaper

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra Weather Alert : राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी पाऊस, गारपीट; विजांचाही इशारा, राज्य आपत्कालीन कार्य केंद्रातर्फे सतर्कतेचे आवाहन

    Supriya Sule : अजितदादांना मतदानातून श्रद्धांजली द्या; बारामतीत सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुप्रिया सुळेंचे भावनिक आवाहन

    Sunetra Pawar : माझे सर्वस्व हरपले, पण मी खचणार नाही; अहिल्यादेवी, येसुबाईंप्रमाणे निष्ठेने जनतेची सेवा करेन; सांगता सभेत सुनेत्रा पवार भावुक