• Download App
    क्रांती रेडकर उतरली पती समीर वानखेडेंच्या समर्थनासाठी; म्हणाली, सत्यमेव जयते!! प्रवाहाविरोधात पोहणाऱ्याला सर्वशक्तिमान वाचवितो!!। Kranti Redkar landed in support of her husband Sameer Wankhede; Said, Satyamev wins !! The Almighty saves the swimmer against the current !!

    क्रांती रेडकर उतरली पती समीर वानखेडेंच्या समर्थनासाठी; म्हणाली, सत्यमेव जयते!! प्रवाहाविरोधात पोहणाऱ्याला सर्वशक्तिमान वाचवितो!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आर्यन खान क्रुज ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडेंवर लाचखोरीचा आरोप झाल्यानंतर त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर प्रथमच आपल्या पतीच्या समर्थनासाठी उतरली आहे. Kranti Redkar landed in support of her husband Sameer Wankhede; Said, Satyamev wins !! The Almighty saves the swimmer against the current !!

    तिने सत्यमेव जयते असे ट्विट करून समीर वानखेंडेंचे समर्थन केले आहे. “जेव्हा तुम्ही लाटेच्या विरुद्ध दिशेने पोहता, तेव्हा तुम्ही बुडू शकता. पण जर तुम्ही सर्वशक्तिमान अर्थात परमेश्वर तुमच्या पाठीशी उभा असेल, तर मात्र जगातील कोणतीही लाट तुम्हाला बुडवू शकत नाही. कारण सत्य हे फक्त त्या परमेश्वरालाच माहिती असते. शुभ सकाळ, सत्यमेव जयते,” असे ट्विट क्रांतीने काही तासांपूर्वी केले आहे. तिच्या या ट्विटवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.



    आर्यन खानला अटक केल्यानंतर त्याचे वडील अभिनेता शाहरूख खान यांच्याकडे २५ कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यातील आठ कोटी रुपये ‘एनसीबी’चे संचालक समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असा गंभीर आरोप ‘एनसीबी’चे पंच प्रभाकर साईल यांनी केला आहे.

    प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करावे

    तर प्रभाकर साईल यांचे प्रतिज्ञापत्र समाज माध्यमांवरून आपल्या निदर्शनास आल्याचे ‘एनसीबी’चे उपमहासंचालक मुथा अशोक जैन यांनी सांगितले.
    प्रभाकर या प्रकरणात साक्षीदार असल्यामुळे त्यांनी हे प्रतिज्ञापत्र समाज माध्यमांऐवजी न्यायालयात सादर करावे. प्रतिज्ञापत्रात त्यांनी एका व्यक्ती विरोधात आरोप केले आहेत. पण समीर वानखेडे यांनी हे आरोप फेटाळले आहेत. काही आरोप पैसे मागण्याच्या संदर्भातील आहेत. त्यामुळे आपण हे प्रतिज्ञापत्र कार्यवाहीसाठी ‘एनसीबी’च्या महासंचालकांना पाठवत असल्याचे जैन यांनी स्पष्ट केले आहे.

    Kranti Redkar landed in support of her husband Sameer Wankhede; Said, Satyamev wins !! The Almighty saves the swimmer against the current !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस