विशेष प्रतिनिधी
मुंबई: मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात क्रांती रेडकर यांनी अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तलवार मलिक रोज समीर वानखेडेंवर नवनवीन आरोप करत आहेत. त्यातच काल त्यांनी काही व्हाट्स अॅप चॅटस् शेअर केले .मात्र ते चॅट्स चुकीच्या पद्धतीने तयार केले असून ते खोटे आहेत. आजवर आपले असे कुणाशी संभाषण झालेले नाही असे क्रांती रेडकर यांचे म्हणणे आहे. Kranti Redkar files FIR against Nawab Malik
नवाब मलिक यांनी एक संभाषण समोर आणले. त्यामध्ये कॅप्टन जॅक स्पॅरो नावाच्या व्यक्तीने क्रांती रेडकरना नवाब मलिक आणि अंडरवर्ल्ड यांच्याबाबत संबंधाचे पुरावे देण्याबाबत ते ट्विट होते.
क्रांतीने जॅक स्पॅरोच्या ट्विटला उत्तर देत कोणते पुरावे आहेत अशी विचारणा केली. ते ट्विटचे फोटो मलिक यांनी ट्विट करत ओह माय गॉड अशी प्रतिक्रिया दिली होती.
त्यानंतर आणखी एक चॅट मलिक यांनी ट्विट करत राज बब्बर यांच्या सोबतचा एक फोटो अपलोड करून ट्विट केले.
राज बब्बर यांची पत्नीदेखील त्यांना प्रेमाने दाऊद म्हणते असे ते ट्विट होते. मला आज सकाळी आनंद मिळाला, सर्वांचा दिवस चांगला जावो असे मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.
आपल्या नावाने खोटे व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार दाखल केल्याचे क्रांती रेडकर यांनी सांगितले आहे.
Kranti Redkar files FIR against Nawab Malik
महत्त्वाच्या बातम्या
- नबाब मलिक यांनी ट्विट केलेला संवादाचा स्क्रीनशॉट फेक, क्रांती रेडकर यांची सायबर सेलकडे तक्रार
- हंगामी पोलीस महासंचालक लोकसेवा आयोगाच्या महासंचालक पदाच्या यादीत नाहीत, हेमंत नगराळे, डॉ. के. वेंकटेशम, रजनीश सेठ शर्यतीत
- ममता बॅनर्जी यांची राजकीय पावले; छोटा पॅकेट बडा धमाका!!
- शेतकऱ्यांसाठी कायदे केले, देशासाठी मागे घेतले, वीर सावरकरांच्या शिकवणुकीतूनच पंतप्रधानांनी घेतला निर्णय