विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : ऍण्टी करप्शन ब्युरोच्या कोल्हापूर शाखेने जानेवारी 2021 पासून जवळजवळ 19 सरकारी अधिकाऱ्यांना लाचखोरीच्या आरोपांवरून अटक केली आहे. या 19 अधिकाऱ्यांपैकी 6 अधिकारी रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे आहेत. 5 पोलिस विभागातील तर एक फायनान्स डिपार्टमेंटमधील आहेत.
Kolhapur branch of Anti-Corruption Bureau arrests 19 government officials on bribery charges
संबंधित अधिकाऱ्यांची तक्रार ऍण्टी करप्शन ब्युरोकडे गेल्यानंतर त्यांनी सापळा रचून सरकारी अधिकाऱ्यांना अटक केली आहे. त्याचप्रमाणे इतर अकरा नागरिकांनादेखील अटक केली आहे. हे नागरिक सरकारी अधिकार्यांच्या नावाने पैसे घेणे, लोकांना फसवणे या आरोपाखाली अटक करण्यात आले आहेत.
अटक करणाऱ्या आणण्यात आलेले 13 अधिकारी क्लास थ्री ऑफिसर्स आहेत. तर दोन क्लास टू ऑफिसर्स आहेत. या अधिकाऱ्यांवर लाचखोरीचा आरोप करण्यात आला आहे. कमीत कमी 5000 तर जास्तीत जास्त 1 लाख रुपयांची लाच या अधिकाऱ्यांनी घेतली आहे असा आरोप करण्यात आला आहे.
डेप्युटी सुपरिटेंन्डेंट ऑफ पोलिस आदिनाथ बुधवंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अधिकाऱ्यांची जामिनावर सुटका झाली असली तरी त्यांना कामावर हजर राहण्याची परवानगी देण्यात आलेली नाहीये. जर वारंवार या अधिकाऱ्यांवर लाचखोरीचे आरोप झाले तर त्यांची नोकरी देखील जाण्याची शक्यता आहे.
Kolhapur branch of Anti-Corruption Bureau arrests 19 government officials on bribery charges
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान