एसटी कर्मचारी ज्यांच्या पाठीमागे उभे राहिले त्यांनीच आज कर्मचाऱ्यांचा घात केला, असा आरोपही पडळकरांनी पवारांवर केला आहे.Knowing that a merger is not possible, why mention it in the manifesto? ; Gopichand Padalkar criticizes Ajit Pawar
विशेष प्रतिनिधी
मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचारी विलीनीकरण मागणीसाठी संप करत आहेत.दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी एसटीचं विलिनीकरण करणं कुणालाही शक्य नसल्याचं वक्तव्य करत याबाबत स्पष्ट प्रतिक्रिया दिली होती. यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांवर टीका केली आहे.
पवार कुटुंबावर विश्वास ठेवू नका हे एसटी कर्मचाऱ्यांना सुरुवातीपासून सांगत होतो, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आज यांचा खरा चेहरा कळला आहे.असं पडळकर म्हणाले.पुढे पडळकर यांनी एक सवाल उपस्थित केला आहे.यावेळी पडळकर म्हणाले की विलिनीकरण शक्य नाही हे अजित पवारांना माहिती होतं, तर राष्ट्रवादीने जाहीरनाम्यात उल्लेख का केला होता?
तसेच एसटी कर्मचारी ज्यांच्या पाठीमागे उभे राहिले त्यांनीच आज कर्मचाऱ्यांचा घात केला, असा आरोपही पडळकरांनी पवारांवर केला आहे. हे सर्व सरकारचे अपयश आहे. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, यांची प्रत्येक ठिकाणी संघटना आहे, अशी खोचक टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.