• Download App
    मुंबईत आज किसान महापंचायत : आंदोलनाची नवी रणनीती ठरवण्यासाठी शेतकऱ्यांचा मेळावा, कृषी कायदे रद्द झाल्यानंतर एमएसपीवर कायद्याची मागणी । Kisan Mahapanchayat in Mumbai today, Farm law withdrawal bill to be introduced in Parliament on 29th

    मुंबईत आज किसान महापंचायत : आंदोलनाची नवी रणनीती ठरवण्यासाठी शेतकऱ्यांचा मेळावा, कृषी कायदे रद्द झाल्यानंतर एमएसपीवर कायद्याची मागणी

    तीनही कृषी कायदे मागे घेतल्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. रविवारी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईतील आझाद मैदानावर शेतकरी आणि मजुरांची महापंचायत होणार आहे. यामध्ये 100 हून अधिक संस्था सहभागी होणार आहेत. संयुक्त किसान मोर्चाचे नेते महापंचायतीला संबोधित करणार आहेत. Kisan Mahapanchayat in Mumbai today, Farm law withdrawal bill to be introduced in Parliament on 29th


    वृत्तसंस्था

    मुंबई : तीनही कृषी कायदे मागे घेतल्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. रविवारी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईतील आझाद मैदानावर शेतकरी आणि मजुरांची महापंचायत होणार आहे. यामध्ये 100 हून अधिक संस्था सहभागी होणार आहेत. संयुक्त किसान मोर्चाचे नेते महापंचायतीला संबोधित करणार आहेत.

    त्याचवेळी सोमवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला केंद्र सरकार हे तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यासाठी ‘कृषी कायदे रद्द विधेयक 2021’ हे विधेयक लोकसभेत मांडणार आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांचा एक छोटा गटच या कायद्यांना विरोध करत आहे, मात्र सर्वसमावेशक विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन जाणे ही काळाची गरज आहे, त्यामुळे हे तीन कायदे मागे घेण्याची तरतूद करण्यात येत आहे. मंत्रिमंडळाने मंजूर केलेले हे विधेयक कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर मांडणार आहेत.



    चर्चेपासून पळ काढल्याबद्दल सरकारचा निषेध करत संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे की, लोकशाहीत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकणे खूप गरजेचे आहे. यासाठी सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या ऐकून त्यावर योग्य तोडगा काढावा. मात्र सरकार हे करत नाहीये.

    29 ची ट्रॅक्टर रॅली रद्द

    शनिवारी सिंघू सीमेवर होणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाच्या (एसकेएम) बैठकीत 29 रोजी होणाऱ्या शेतकरी संसदेच्या मोर्चाचे नियोजन पुढे ढकलण्यात आले. तासभर चाललेल्या महापंचायतीत ट्रॅक्टर रॅली न काढण्याचे मान्य करण्यात आले. शेवटच्या दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबरला शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शेतकऱ्यांनी 29 नोव्हेंबरला संसदेच्या दिशेने ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली होती.

    Kisan Mahapanchayat in Mumbai today, Farm law withdrawal bill to be introduced in Parliament on 29th

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!