मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांचे बंगले असलेल्या कोलइ गावात कोरोनाचे कारण देऊन गावबंदी आणि घरबंदी करण्यात आली आहे. घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी जाणार होतो. त्यामुळेच हा निर्णय घेतला असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.Kirit Somayya alleges village ban in Uddhav Thackeray’s bungalow, corona restrictions imposed to stop me
प्रतिनिधी
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांचे बंगले असलेल्या कोलइ गावात कोरोनाचे कारण देऊन गावबंदी आणि घरबंदी करण्यात आली आहे. घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी जाणार होतो.
त्यामुळेच हा निर्णय घेतला असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.सोमय्या म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या 19 बंगल्यांच्या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी येत आहे,
असं मी 1 जून रोजी कोर्लई ग्रामपंचायत, तहसीलदार आणि अधिकाऱ्यांना कळविले होते. त्यावर प्रशासनाने 4 जून रोजी गावबंदी आणि घरबंदीचा काढण्यात आलेला आदेश मला पाठवला.
त्यामध्ये कोर्लई गावातून बाहेर पडण्यास तसेच इतर गावातून कोर्लईत येण्यास प्रतिबंध लादला गेला आहे. गावातील शेवटचा कोरोना रुग्ण बरा झाल्यानंतरही 28 दिवसापर्यंत हा लॉकडाऊन, गावबंदी कायम राहील, असे अलिबाग प्रशासनाने या आदेशात म्हटलं आहे.
या आदेशानुसार कोर्लई गावात 100 दिवसांची घरबंदी, गावबंदी राहणार आहे. गाव कोरोनामुक्त झाल्यानंतरही 28 दिवस गावबंदी करण्याचा अधिकार प्रशासनाला कोणत्या कायद्यांतर्गत मिळाला आहे?
रायगड सोडा महाराष्ट्र आणि देशात अशा प्रकारची गावबंदी कुठे घालण्यात आली आहे? हे मला दाखवून द्या, असे आव्हान सोमय्या यांनी दिले आहे.
मी ठाकरे, वायकर परिवाराच्या 19 बंगल्यांच्या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी येत असल्याने प्रशासनाने आदेश काढला,
असे मला म्हणायचे नाही. परंतु गावकऱ्यांवर अशा प्रकारचा अत्याचार, सत्येचा राक्षसी उपयोग कोणत्या कायद्याखाली केला? हा माझा ठाकरे सरकारला प्रश्न आहे, असे सांगून सोमय्या म्हणाले, कोरोना उपचाराला प्राधान्य देणे ही आमचीही जबाबदारी आहे.
परंतु, कोर्लईत सत्तेचा राक्षसी दुरुपयोग करण्यात आला असून त्याचा पुनर्विचार व्हावा. लॉकडाऊन 7-7 दिवसाचे असतात असे अनिश्चित लॉकडाऊन फक्त कोर्लाईसाठीच आहेत का?
Kirit Somayya alleges village ban in Uddhav Thackeray’s bungalow, corona restrictions imposed to stop me
महत्त्वाच्या बातम्या
- दिल्लीच्या रुग्णालयात नर्सना ड्यूटीदरम्यान मल्याळम बोलणावर बंदी, तीव्र निषेधानंतर आदेश मागे
- Corona Updates : कोरोना संसर्गाच्या वेगाला ब्रेक, २ महिन्यांत सर्वात कमी १.१४ लाख नवीन रुग्ण, २४ तासांत २६७७ मृत्यू
- ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास, मुंबईतील रुग्णालयात दाखल
- मनी मॅटर्स : खरेदीवेळी संयमाची परिक्षा
- मेहूल चोक्सीच्या अटकेमागील बार्बरा जराबिका आहे तरी कोण? गर्लफ्रेंड की हनीट्रॅप