• Download App
    उध्दव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस, किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल|Kirit Somaiya's attack on Uddhav Thackeray

    उध्दव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस, किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेनेने उत्तर प्रदेशमधील सर्व ४०३ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. यावरून भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा, असे त्यांनी म्हटले आहे.Kirit Somaiya’s attack on Uddhav Thackeray

    शिवसेनेचे उत्तर प्रदेशचे प्रभारी विश्वजीत सिंह यांनी एक पत्रक जारी करून उत्तर प्रदेशात निवडणुका लढविण्याची घोषणा केली. याबाबत सोमय्या म्हणाले, यापूर्वी बिहारमध्ये निवडणूक लढवताना शिवसेनेच्या उमेदवारांचं डिपॉझीट जप्त होण्याबरोबरच काही उमेदवारांना १०० मतंही पडली नव्हती. पण उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस आहे.



    शिवसेनेनं उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकावर टीका केलीय. राज्यामध्ये शिक्षण, रोजगार, कायदा सुव्यवस्था यासारखे प्रश्न सध्या सत्तेत असणाऱ्या भाजपाच्या कार्यकाळात निर्माण झाल्याचं सांगतानाच भाजपाला धडा शिकवण्यासाठी सर्वच्या सर्व मतदारसंघांमधून शिवसेना उमेदवार देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

    १० सप्टेंबर रोजी लखनऊमधील हरतगंज येथे शिवसेनेच्या उत्तर प्रदेशमधील नेत्यांची बैठक पार पडली. आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना आणि पक्षाची वाटचाल कशी असणार यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली. यावेळी उत्तर प्रदेशमधील शिवसेनेचे प्रमुख नेते ठाकूर अनिल सिंह यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका करताना उत्तर प्रदेश सरकारमध्ये कायदा सुव्यवस्था सक्षम नसल्याची परिस्थिती आहे, अशी टीका केली. उत्तर प्रदेशमध्ये जंगलराज सुरु असून महिला आणि मुलींवर अत्याचार होत असल्याची टीका ठाकूर यांनी केलीय.

    शिवसेनेने जारी केलेल्या पत्रामध्ये, सरकार ब्राह्मणांविरोधात गैरव्यवहार करत आहे. राज्यामध्ये आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती फारच वाईट आहे. कोरोना रुग्णांचे मृतदेहांवर अत्यंसंस्कार करण्यासाठी सामान उपलब्ध होत नव्हतं अशी परिस्थिती आहे. बंद असणाऱ्या शाळाही राज्यामधील विद्यार्थ्यांकडून हव्या तशा पद्धतीने फी घेताना दिसत आहेत.

    सरकार शिक्षणसम्राटांच्या बाजूने आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही विद्यालयांमधील फी १५ टक्क्यांनी कामी करण्यात आलेली नाही. महाराष्ट्र सरकारने कायदा बनवून विद्यार्थ्यांना १५ टक्के फी सवलत दिली. उत्तर प्रदेशमध्ये बेरोजगारी आणि महागाईमुळे तरुण मुलं राज्य सोडून जात आहेत. सरकार शेतकरी आणि तरुणांसोबत सावत्र असल्याप्रमाणे व्यवहार करत आहे, असे आरोप करत सत्ताधाºयांवर निशाणा साधला आहे.

    Kirit Somaiya’s attack on Uddhav Thackeray

    महत्त्वाच्या बातम्या.

    Related posts

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!