• Download App
    किरीट सोमय्या यांनी येऊन जिल्हा भडकवण्याचं काम अजिबात करू नये ; जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर | Kirit Somaiya should not come and provoke the district; District Guardian Minister Yashomati Thakur

    किरीट सोमय्या यांनी येऊन जिल्हा भडकवण्याचं काम अजिबात करू नये ; जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर

    विशेष प्रतिनिधी

    अमरावती : अमरावतीमध्ये नुकताच हिंसाचाराच्या बऱ्याच घटना घडून आल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर तेथे कलम 144 नुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशा वेळीच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपला अमरावती दौरा आखला आहे. अशा नाजूक परिस्थितीमध्ये किरीट सोमय्या यांनी आपला दौरा रद्द करावा अशी नोटीस अमरावती पोलिसांनी सोमय्या यांना दिली आहे.

    Kirit Somaiya should not come and provoke the district; District Guardian Minister Yashomati Thakur

    किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत यासंबंधीची अधिक माहिती दिली आहे. पोलिसांच्या या आदेशामुळे त्यांनी राज्य सरकारवर टीका देखील केली आहे. यावर आता जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे.


    Nawab Malik V/s Kirit Somaiya : सोमय्यांची धमकी पोकळ, मीच अधिवेशनात पोलखोल करणार, मलिकांचा पुन्हा वार


    त्या म्हणतात, अमरावतीचे आधीच खूप नुकसान झालेले आहे. किरीट सोमय्या यांना इथे येऊन अजून कोणती गोष्ट साध्य करायची आहे? त्यांना कोणता मुद्दा भडकवायचा आहे? इतर वेळी खास कारणासाठी या. आणि पंधरा दिवस राहा. काही हरकत नाही. पण इथे यायचं ते लक्ष वेधून घेण्यासाठी यायचं, नाटकी करायची. पोलिसांनी आम्हाला पकडले असे दाखवायचे आणि नंतर आरडाओरडा करायचा. हे आम्ही कबूल करत नाही. असे त्यांनी परखड शब्दांमध्ये किरीट सोमय्या यांनी सांगितले सुनावले आहे.

    अमरावतीमध्ये काही प्रॉब्लेम झाले होते ते आम्ही निस्तरत आहोत. किरीट सोमय्या यांनी येऊन आमचं गाव, आमचा जिल्हा भडकवण्याचं काम अजिबात करू नये असे त्यांनी सांगितले आहे.

    Kirit Somaiya should not come and provoke the district; District Guardian Minister Yashomati Thakur

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस