• Download App
    रश्मी ठाकरे यांचे 19 बंगले : किरीट सोमय्या - शिवसेना संघर्ष आज कोर्लाई गावाभोवती केंद्रित!! Kirit Somaiya - Shiv Sena struggle today centered around Korlai village

    रश्मी ठाकरे यांचे 19 बंगले : किरीट सोमय्या – शिवसेना संघर्ष आज कोर्लाई गावाभोवती केंद्रित!!

    प्रतिनिधी

    मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि शिवसेना यांच्यातील हा संघर्ष आज कोर्लाई गावाभोवती केंद्रित झाला आहे. कालच जाहीर केल्याप्रमाणे किरीट सोमय्या आज सकाळीच कोर्लाई गावाच्या दिशेने रवाना झाले. जिथे रश्मी ठाकरे यांचे 19 बंगले चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी आधीच पोलिसात दिली आहे.Kirit Somaiya – Shiv Sena struggle today centered around Korlai village

    याच मुद्द्यावरून शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आणि शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना घेरले असून किरीट सोमय्या नावाचे भूत भाजपच्या मानगुटीवर बसले आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी सोमय्या यांचे वाभाडे काढले आहेत, तर कोर्लाई गावात जाऊन मला वस्तुस्थिती समजून घ्यायची आहे. बाकी मला काही म्हणायचे नाही. उद्धव ठाकरे यांनी पुढे येऊन आपल्या पत्नीच्या नावे असलेल्या 19 बंगल्यांची माहिती जनतेला द्यावी एवढीच माझी अपेक्षा आहे.


    भुजबळांच्या बेनामी प्रॉपर्टीची पाहणी केल्याबद्दल पोलिसांची नोटीस : किरीट सोमय्या; पण नोटीस नेमकी कशासाठी?


    प्रशासन आणि पोलीस मला जिथपर्यंत जाऊ देतील तिथपर्यंत जाईन. त्यांनी मला गावात जाण्यापासून अडवले तर मी माझा विनंतीअर्ज प्रशासन आणि पोलिसांच्या हातात सोपवून निघून येईन. मला एवढेच जाणून घ्यायचे की कोर्लाई गावातले रश्मी ठाकरे यांच्या नावावरचे 19 बंगले गेले कुठे??, अशा खोचक शब्दांमध्ये किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांना डिवचले आहे.

    त्यामुळे रायगड जिल्ह्यातील शिवसैनिक, शिवसेना आमदार भरत गोगावले महेंद्र दळवी यांनी संतापून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. किरीट सोमय्या यांना नौटंकी करण्यात 1 नंबर आहे. टीव्ही चॅनेलवर झळकण्यासाठी तो ही नाटके करतो आहे. त्याला रायगड स्टाईलने धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आमदार भरत गोगावले आणि महेंद्र दळवी यांनी दिला आहे.

    Kirit Somaiya – Shiv Sena struggle today centered around Korlai village

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    अमेरिकेचे उपाध्यक्ष भारतात, भारताचे पंतप्रधान सौदी अरेबियात; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य मोठे!!

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!