विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांना सकाळी ९ वाजता संचेती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ते मुंबई कडे रवाना होत आहेत. Kirit Somaiya discharged from hospital
महापालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढा अशी मागणी करत सोमय्या यांना शनिवारी दुपारी धक्काबुक्की करण्यात आली. खाली पाडण्यात आले. गाडीवर बुक्क्या मारण्यात आल्या. आक्रमक शिवसैनिकांनी हा हल्ला केला. हा गोंधळ जवळपास पाच ते दहा मिनिट सुरू होता. पालिकेत शिवसैनिकांनी राडा घालत सोमय्यांना पालिकेतून निघून जाणे भाग पाडले.
महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी आलेल्या किरीट सोमय्या (वय ७०) यांना दक्षता म्हणून कालच सायंकाळी संचेती रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. भाजपचे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी सांगितले की सोमय्या यांना सकाळी घरी सोडण्यात आले आहे.
शिवसैनिकांनी वाटेतच अडवत जाब विचारणे सुरू केले. महा विकास आघाडीच्या नेत्यांना सोमय्या लक्ष्य करत आहेत, आणि स्वपक्षीयांच्या भ्रष्टाचाराबद्दल काही बोलत नाहीत असा शिवसैनिकांचा आक्षेप होता.