शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. आता पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या यांनी संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांवर १०० कोटींच्या जंबो कोविड केअर सेंटर घोटाळ्याचा आरोप केला आहे. याबाबत किरीट सौमय्या यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाकडे चौकशी आणि तक्रार करण्याची मागणी केली आहे. Kirit Somaiya accuses Sanjay Raut and his family of Rs 100 crore scam, challenges
वृत्तसंस्था
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. आता पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या यांनी संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांवर १०० कोटींच्या जंबो कोविड केअर सेंटर घोटाळ्याचा आरोप केला आहे. याबाबत किरीट सौमय्या यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाकडे चौकशी आणि तक्रार करण्याची मागणी केली आहे.
संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे हे काम मिळवल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. लाइफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस नावाने भागीदारी फर्म स्थापन केल्याचा दावा खोटा असल्याचा आरोप त्यांनी राऊत यांच्यावर केला. मुंबईच्या दहिसर वरळी NSCI महालक्ष्मी रेसकोर्स मुलुंड कोविड-केअर सेंटरमध्ये काम मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे तक्रार केली असून चौकशीची मागणीही केली आहे.
याआधीही किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर वाईन कंपनीत भागीदारी असल्याचा आरोप केला होता. राऊत यांची महाराष्ट्रातील बडे उद्योगपती अशोक गर्ग यांच्या मॅग्पी ग्लोबल लिमिटेड या वाईन कंपनीत भागीदारी असल्याचे सौमय्या यांनी सांगितले होते. या व्यवसायात त्यांची मोठी गुंतवणूक आहे. संजय राऊत यांच्या दोन्ही मुली आणि पत्नी या कंपनीत संचालक पदावर आहेत. वाइन व्यवसायात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्यामुळे मॉल्स आणि किराणा दुकानांमध्ये वाइन विकण्याच्या निर्णयाला संजय राऊत समर्थन देत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.
मात्र, किरीट सोमय्या यांच्या आरोपांना राऊत यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. राऊत म्हणाले होते, “किरीट सोमय्या यांची मुले चणे विकतात का? अमित शहांची मुले केळी विकतात का? डान्सबार उघडून भाजप नेत्यांची मुले बसली आहेत. माझा काही वायनरी व्यवसाय असेल तर भाजप नेत्यांनी तो ताब्यात घेऊन चालवावा. माझ्या मुली एखाद्या कंपनीत डायरेक्टर असतील तर काय चुकले. एखाद्या भाजप नेत्याच्या मुलासारखे ड्रग्ज व्यवसाय नाहीत.”
Kirit Somaiya accuses Sanjay Raut and his family of Rs 100 crore scam, challenges
महत्त्वाच्या बातम्या
- पुण्यात चोवीस तासांत १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू; बाधित रुग्णांची संख्या गेली दोन हजारांवर
- भारतात राजस्थानात सापडली सोन्याची खाण; भिलावडा येथे सोन्यासह, तांब्याचे विपूल साठे
- फास्टॅगला आता बायबाय ; जीपीएसद्वारे टोल कापण्याची नवी प्रणाली लागू होणार
- श्रीनगरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा; पोलिसांची कारवाई, पिस्तुलासह आक्षेपार्ह साहित्य केले जप्त