आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील एनसीबीचा मुख्य साक्षीदार किरण गोसावी यालापरदेशात नोकरी लावतो असे सांगून फसवणुक केल्याप्रकरणी पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. Kiran Gosavi, NCB’s key witness in Aryan Khan drugs case, remanded in police custody for five days
विशेष प्रतिनिधी
पुणे : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील एनसीबीचा मुख्य साक्षीदार किरण गोसावी यालापरदेशात नोकरी लावतो असे सांगून फसवणुक केल्याप्रकरणी पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे
भोसरी पोलीसांनीसोमवारी (दि. २२) अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यापूर्वी पुणे शहर पोलीसांनी लष्कर आणि फरासखाना पोलीस ठाण्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यात गोसावी याला अटक केली होती. विजयकुमार सिद्धलिंग कानडे (वय ३३, रा. शिवशंकर कॉलनी, चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादी कानडे हे नोकरी शोधत होते. एका जॉब पोर्टल वरून त्यांना ई-मेल आला. गोसावी याने कानडे यांना ब्रुनेई येथे नोकरी लावतो, असे सांगितले. त्यासाठी अडीच लाख रुपये फी सांगितली. नोकरीची गरज असल्याने कानडे यांनी ठाणे येथील।कार्यालयात जाऊन गोसावीला वेळोवेळी पैसे दिले. त्यानंतर नोकरी पक्की झाली आहे. विमानाचे तिकीट आणि व्हिसा पाठवला.
मात्र, त्यानंतर गोसावी याने कानडे यांचे कॉल उचलणे बंद केले. त्यानंतर कानडे यांना गोसावीचा कोणताही ठावठिकाणा मिळत नव्हता.
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात किरण गोसावीचे नाव आल्यानंतर आणि टिव्हीवर गोसावीची बातमी पाहिल्यावर फसविणारा किरण गोसावीच आहे याची खात्री कानडे यांना झाली. त्यानंतर कानडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. पुणे शहर पोलीसांनी लष्कर आणि फरासखाना पोलीस ठाण्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यात गोसावी याला अटक केली. दरम्यान, भोसरीतील फसवणुक प्रकरणात भोसरी पोलिसांनी गोसावी याला सोमवारी (दि. २२) अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
Kiran Gosavi, NCB’s key witness in Aryan Khan drugs case, remanded in police custody for five days
महत्त्वाच्या बातम्या
- वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे; हिंगोली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी साकारतेय घनदाट जंगल
- दिलासा ! शहीद CRPF जवानांच्या कुटुंबियांना मोदी सरकारकडून मिळणार आत्ता ३५ लाखांची मदत
- काँग्रेस पक्ष फोडून विरोधी ऐक्य कसे साधणार?; सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांचा परखड सवाल
- PMGKAY : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मार्च 2022 पर्यंत मिळाली मुदतवाढ; गरिबांना मोदी सरकारचा दिलासा
- CONGRESS VS TMC : दिल्लीत ममता दिदींची सोनियांना टाळत मोदी भेट- मेघालयमध्ये काँग्रेसला तृणमूलचा दे धक्का ! मुकुल संगमांसह १८ पैकी १२ आमदारांचा तृणमूल प्रवेश