वृत्तसंस्था
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर मराठी अभिनेत्री केतकी चितळे अडचणीत सापडली होती. या प्रकरणात केतकीला ठाणे न्यायालयाने अॅस्ट्रॉसिटी कायद्यांतर्गत जामीन मंजूर केला आहे. केतकीला २५ हजार रूपयांच्या जामीनावर सध्या जामीन मंजूर करण्यात आला आहे.Ketki Chitale granted bail of Rs 25,000; Still in jail !!; Notice to the Director General of Police of the Central Commission for Women
केतकी चितळेला ठाणे न्यायालयाने दिलासा दिला आहे. असे असले तरी केतकीचा मुक्काम मात्र तुरूंगातच राहणार आहे. कारण ती आणखी एका प्रकरणात आरोपी आहे, ज्या प्रकरणावर २१ जून रोजी जामीनावर सुनावणी होणार आहे.
शरद पवार यांच्यावर सोशल मीडियावर टीका केल्यानंतर केतकी चितळेला पोलिसांनी अटक केली. पवारांवर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या केतकीच्या त्या पोस्टनंतर राज्यभर तिच्याविरोधात आंदोलने झाली. यासह तिच्याविरोधात राज्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता केतकी चितळेने आपल्याला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत त्याविरोधात पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाची दारे ठोठावली आहेत.
मात्र, आता केंद्रीय महिला आयोगाने केतकी चितळे प्रकरणावरील महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना नोटीस पाठवली आहे.
Ketki Chitale granted bail of Rs 25,000; Still in jail !!; Notice to the Director General of Police of the Central Commission for Women
महत्वाच्या बातम्या
- SSC Result 2022 : दहावीचा निकाल उद्या 17 जूनला होणार जाहीर
- पंकजांचा “नवा पक्ष” नुसताच इम्तियाजच्या मनी; मराठी माध्यमे मारतात मोठ्ठी उंच उडी!!
- केंद्राची खुशखबर : लवकरच वाढणार पेन्शन आणि निवृत्तीचे वयही!!; सरकारची योजना
- अदानी – पवार : काँग्रेसच्या टार्गेटवर अंबानी – अदानी “नियमित”; सायन्स सेंटरच्या उद्घाटनासाठी गौतम अदानी पवारांच्या बारामतीत!!