‘कौन बनेगा करोडपती 13’ या प्रश्नमंजूषा कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय वाढत चालली आहे. शोला खूप पसंती मिळत आहे. शो सुरू होऊन अवघे चारच दिवस झाले असून आता बातमी आहे की, या शोला पहिला करोडपती मिळाला आहे. हिमानी बुंदेला असे या स्पर्धकाचे नाव आहे. 30 आणि 31 ऑगस्ट रोजी 1 कोटी रुपये जिंकणाऱ्या या स्पर्धकाचा एपिसोड ऑन एअर होईल. दृष्टिहीन स्पर्धक हिमानी बुंदेलाने उत्तरे देऊन एक कोटी रुपये जिंकल्याचे सांगण्यात येत आहे. KBC 13 First Crorepati kaun banega crorepati 13 himani bundela Became First crorepati
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘कौन बनेगा करोडपती 13’ या प्रश्नमंजूषा कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय वाढत चालली आहे. शोला खूप पसंती मिळत आहे. शो सुरू होऊन अवघे चारच दिवस झाले असून आता बातमी आहे की, या शोला पहिला करोडपती मिळाला आहे. हिमानी बुंदेला असे या स्पर्धकाचे नाव आहे. 30 आणि 31 ऑगस्ट रोजी 1 कोटी रुपये जिंकणाऱ्या या स्पर्धकाचा एपिसोड ऑन एअर होईल. दृष्टिहीन स्पर्धक हिमानी बुंदेलाने उत्तरे देऊन एक कोटी रुपये जिंकल्याचे सांगण्यात येत आहे.
नुकतेच हिमानीने तिच्या विजयाबद्दल सांगत जिंकलेल्या रकमेचा वापर कसा करणार आहे, हे सांगितले. ती म्हणाली, “बिग बींचा आवाज ऐकून मी स्तब्ध झाले. ते म्हणाले की, मी एक कोटी रुपये जिंकले आहेत. मी पूर्णपणे ब्लँक झाले होते. मी फक्त माझे दोन्ही हात वर केले आणि त्या क्षणाचा आनंद साजरा केला.”
10 वर्षांपासून प्रयत्न
हिमानीने असेही सांगितले की, ती गेल्या 10 वर्षांपासून या शोसाठी प्रयत्न करत आहे. ती म्हणाली, “मी केबीसीसाठी 14-15 वर्षे वयाची असल्यापासून प्रयत्न करत आहे. आता मी 25 वर्षांची आहे, मी अखेरचा प्रयत्न करत होते. मी क्विझ शोसाठी मेसेज पाठवत असे, पण ते नेहमी पेंडिंग दिसायचे.” हिमानी पुढे म्हणाली, “मग मी नेहमी विचार करायचे की निवडीची प्रक्रिया काय असावी, ती मेसेजद्वारे आहे का? पण जेव्हा ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली आणि नोंदणी केल्यानंतर मला मेसेज आला की, तुम्ही नोंदणी केली आहे. मी हॉट सीटवर कधी बसेन असा विचारही केला नव्हता.”
हिमानी म्हणाली, “मी शोमध्ये जिंकलेल्या रकमेचा खुलासा करू शकत नाही. मला सर्वसमावेशक कोचिंग सुरू करायचे आहे. आमच्याकडे सर्वसमावेशक विद्यापीठ आहे, पण कोचिंग नाही ते स्पर्धा परीक्षेसाठी असेल जेथे अपंग आणि सामान्य मुले एकत्र अभ्यास करतील. आम्ही त्यांना यूपीएससी, सीपीसीएस साठी तयार करू. मी अंध मुलांना ‘मानसिक गणित’ शिकवण्यासाठीही पुढाकार घेतला. मला माझ्या वडिलांचा छोटा बिझनेस सेटल करायचा आहे, लॉकडाऊनदरम्यान त्याचे नुकसान झाले होते.”
KBC 13 First Crorepati kaun banega crorepati 13 himani bundela Became First crorepati
महत्त्वाच्या बातम्या
- Corona Vaccination : कोरोनाविरुद्ध लसीकरणाचा देशात नवा विक्रम, एका दिवसात ९३ लाखांहून जास्त डोस दिले
- दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने महाविद्यालय, वाजपेयी-जेटली यांच्या नावांनीही केंद्रांची उभारणी
- ओबीसी राजकीय आरक्षण बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी मांडल्या सूचना… कोणत्या?… त्या वाचा…!!
- देशाचा जीडीपी 9.5% राहण्याचा अंदाज, महागाईसुद्धा कमी होणार – RBI गव्हर्नर शक्तिकांत दास
- Sarada Scam : शारदा घोटाळ्याच्या आरोपपत्रात तृणमूल सरचिटणीस कुणाल घोष यांचे नाव, घोष म्हणाले- केंद्राकडून सूड भावनेने कारवाई