अंबाजोगाईच्या जिल्हा सत्र न्यायालयात ही सुनावणी होईल. यावेळी न्यायालय करुणा मुंडे यांना जामीन देणार किंवा नाही, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
विशेष प्रतिनिधी
बीड : जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या करुणा मुंडे यांच्या जामिनावर मंगळवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे. अंबाजोगाईच्या जिल्हा सत्र न्यायालयात ही सुनावणी होईल. यावेळी न्यायालय करुणा मुंडे यांना जामीन देणार किंवा नाही, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. Karuna Munde bail hearing plea in ambajogai session court
करुणा मुंडे बीडमध्ये असताना त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आले होते. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. 6 सप्टेंबरला पोलिसांनी करुण यांना न्यायालयात हजर केले होते. तेव्हा न्यायालयाने करुणा शर्मा यांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. तसेच त्यांच्या ड्रायव्हरला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
दरम्यान, करुणा मुंडे यांच्या गाडीच्या डिक्कीत पिस्तूल ठेवल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शर्मा यांची गाडी बाजारात आल्याचं दिसत आहे. गाडीभोवती गर्दी झाल्याने ही गाडी काही थोडावेळ बाजारात थांबली. त्याच संधीचा फायदा घेत एका व्यक्तीने शर्मा यांच्या कारची डिक्की उघडली. तर पिवळी ओढणी परिधान केलेली महिला कारमध्ये काही तरी ठेवताना दिसत आहे. त्यानंतर ही गाडी पुढे निघून गेल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.
परळीत आल्यानंतर आपल्या अंगावर जमाव धावून आला होता, अशी तक्रार शर्मा यांनी परळी शहर पोलिसात दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी 70 ते 80 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. शहरात प्रवेश केल्यानंतर जमावाने त्यांची गाडी रोखली होती. काही क्षण ही गाडी थांबल्यानंतर त्या परत निघून गेल्या होत्या.
भीमसैनिकांची घोषणाबाजी
आंबाजोगाई कोर्टाबाहेर भीमसैनिकांनी मुंडे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. मुंडे या शहरातून आल्या आहेत. त्या परळीत कुणाला ओळखत नाहीत. कोण कोणत्या जातीचा आहे हे त्यांना माहीत नाही. त्यामुळे त्या कुणाला जातीवाचक शिवीगाळ कशा देतील? दलित समाजाला पुढे करून मुंडे यांच्या विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलं असून हे चुकीचं आहे. दलित समाजाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असून अॅट्रोसिटी कायद्याचाही गैरवापर असल्याचं भीमसैनिकांनी म्हटलं आहे.
Karuna Munde bail hearing plea in ambajogai session court
महत्त्वाच्या बातम्या
- काँग्रेस दहशतवादाची जननी, नेहरूंचा रामावर विश्वास, इंदिराजींनी संतांवर गोळीबार केला तर सोनियांनी रामाचे अस्तित्व नाकारले, योगी आदित्यनाथांचा आरोप
- अफगणिस्थानचे माजी उपराष्ट्रपती सालेह यांच्या घरात सोन्याच्या वीटा, डॉलर्सच्या बंडलासह सापडले ४८ कोटी, तालीबानचा दावा
- किरण रिजीजू यांची धडाकेबाज कामगिरी पाहून सरन्यायाधिश म्हणाले, मला वाटले ते तर ऑक्सफोर्डमध्ये शिकलेत, नंतर समजले गावातील शाळेत घेतले शिक्षण
- इन्फोसिससारख्या कंपनीला देशद्रोही म्हणणे चुकीचे, पांचजन्यमधील लेखावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली नाराजी