विशेष प्रतिनिधी
कराड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या तिरंगी निवडणुकीमध्ये अतुल भोसले पॅनेलने निर्विवाद विजय प्राप्त केला आहे. अतुल भोसले पॅनेलने विरोधकांचा २१/० ने धुव्वा उडविला आहे. Karad : Yeshwantrao Mohite Krishna Sugar Mill Election Result
पश्चिम महाराष्ट्राच्या साखरपट्ट्यातील सातारा-सांगली जिल्ह्यांवर प्रभाव टाकणाऱ्या या कारखान्याच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष्य लागले होते.
सकाळी ९ च्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली होती. कराड येथील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी झाली. सायंकाळी निकाल जाहीर करण्यास सुरुवात झाला. सहकार पॅनेलच्या विजयाची घोषणा होताच गुलालाची उधळण होत होती.
कारखान्याची निवडणूक मंगळवारी ( ता.२९) पार पडली. या निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले. एकूण ९१ टक्के मतदान झाले. ही निवडणूक तिरंगी झाली. सहकार पॅनेल, रयत पॅनेल आणि संस्थापक पॅनेल अशा तीन पॅनेलमध्ये चुरशीची लढत झाली.
कृष्णा कारखान्याच्या भागावर विद्यमान मंत्री जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील, विश्वजित कदम यांचा प्रभाव असल्यानं ही निवडणूक चुरशीची ठरली. माजी चेअरमन अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल आणि इंद्रजित मोहिते यांच्या रयत पॅनेलमध्ये मनोमिलन झाले नाही. या दोघांची थेट लढत विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले , डॉ. अतुल भोसले यांच्या सहकार पॅनेलशी झाली. राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी रयत पॅनलसाठी मागील आठवडाभर आक्रमक प्रचार केला होता.
Karad : Yeshwantrao Mohite Krishna Sugar Mill Election Result
महत्त्वाच्या बातम्या
- योगी सरकारची मिशन 30 कोटी योजना, एकाच दिवसात करणार 25 कोटी वृक्षांची लागवड
- Core Sector Output : आठ कोअर सेक्टरमध्ये मे महिन्यात 16.8 टक्के वाढ, सरकारकडून आकडेवारी जाहीर
- अजितदादांच्या आणि सुनेत्रा पवारांच्या नातेवाईकांचा जरंडेश्वर साखर कारखाना ED कडून जप्त
- डिजिटल इंडियाला 6 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पीएम मोदींचा लाभार्थींशी संवाद, कोरोना काळात डिजिटल कनेक्टिव्हिटीचे महत्त्व केले विशद
- केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर कोव्हिशील्ड लसीला 9 युरोपीय देशांनी दिली मान्यता, कोव्हॅक्सिनबद्दलही गुड न्यूज