- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराज याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. छत्तीसगड पोलिसांनी अटक केली होती. Kalicharan Maharaj arrested by Pune police, taken into custody by Raipur police
विशेष प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराज याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. छत्तीसगड पोलिसांनी अटक केली होती.
खडक पोलिस ठाण्यात 1 महिन्यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये कालीचरण महाराजाला अटक करण्यात आली आहे. महात्मा गांधी यांच्या विरोधात धर्मसंसदेमध्ये आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केल्यानंतर कालीचरण महाराजावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक देखील करण्यात आली. रायपूर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केल्यानंतर पोलीस कोठडी घेण्यात आली होती.
पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे, मोहनराव शेटे, दीपक नागपुरे, कालीचरण महाराज, नंदकिशोर एकबोटे आणि दिगेंद्रकुमार यांच्यावर भादवी कलम २९५ (अ), २९८,५०५ (२),३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवार पेठेतील नातूबाग मैदानात पोलीस अंमलदार सोमनाथ ढगे यांनी तक्रार दिली आहे. शिवप्रतापदिन अर्थात अफझलखान वधाच्या आनंदोत्सव कार्यक्रमात वादग्रस्त भाषण करण्यात आले होते.
रायपूर पोलिसांनी कालीचरण महाराजाला अटक केल्याची माहिती मिळाल्यानंतर खडक पोलिसांनी न्यायालयाकडे कालीचरण महाराजाचा ताबा मिळण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने पुणे पोलिसांची विनंती मान्य करून कालीचरण महाराजाचा ताबा पुणे पोलिसांकडे दिले आहे. रायपूर पोलीस न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड घेऊन पुणे पोलीस पुण्याकडे रवाना झाले.
Kalicharan Maharaj arrested by Pune police, taken into custody by Raipur police
महत्त्वाच्या बातम्या
- अब्दुल सत्तार कार्ड ऍक्टिव्हेट : काल गडकरींची स्तुती, आज चंद्रकांत खैरेंची टीका, दिल्लीत रावसाहेब दानवेंची गळाभेट
- मुस्लिम महिलांनंतर हिंदू महिलांचीही बदनामी : टेलिग्राम चॅनलवर शेअर होत होते हिंदू महिलांचे अश्लील फोटो, केंद्र सरकारने केले ब्लॉक
- निवडणुकीसाठी तयारीला लागा; मी माझ्या कामाने माझी पोचपावती देतो – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- सर्वांना “बाळा” म्हणणार्या सिंधुताईंना माझं नाव मात्र तोंडपाठ होत ; तेजस्विनी पंडित गहिवरल्या